निवडश्रेणी प्रशिक्षणापासून पात्र केंद्रप्रमुख वंचित
By Admin | Updated: November 12, 2014 22:42 IST2014-11-12T22:42:20+5:302014-11-12T22:42:20+5:30
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बाबुपेठ चंद्रपूर येथे निवडश्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षण प्रमुख प्राचार्य शरद पाटील यांनी याबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) चंद्रपूर यांना पत्र

निवडश्रेणी प्रशिक्षणापासून पात्र केंद्रप्रमुख वंचित
चंद्रपूर : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बाबुपेठ चंद्रपूर येथे निवडश्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षण प्रमुख प्राचार्य शरद पाटील यांनी याबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) चंद्रपूर यांना पत्र देवून प्रत्येक पंचायत समितीकडून शिक्षक, पदविधर, केंद्रप्रमुख २४ वर्ष पूर्ण सेवा, उच्च शिक्षण व इतर अटी पूर्ण करणाऱ्या पात्र शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्याची यादी मागविलेली होती. मात्र केंद्रप्रमुख निवडश्रेणीत गटशिक्षणाधिकारी संभ्रमात असल्याने मोठा घोळ निर्माण झाला असल्याचे केंद्रप्रमुख संघटनेचे रामराव हरडे यांनी म्हटले आहे.
केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती देताना वेतन निश्चितीबाबत त्रिस्तरीय वेतनश्रेणीत वेतन घेणाऱ्या शिक्षकाची केंद्रप्रमुख या पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांना मूळ त्रिस्तरीय वेतन श्रेणीत अनुदेय असलेली वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी केंद्रप्रमुख हे पद धारण करताना त्या-त्या तारखेपासून अनुदेय राहील. असे स्पष्ट आदेश असतानासुद्धा पदविधर- केंद्रप्रमुख सेवा सलग न धरता केंद्रप्रमुख पदापासून सेवा मोजण्याबाबतचा संभ्रम चंद्रपूर वगळता सर्व पंचायत समितील गटशिक्षणाना असल्याने त्यांना पात्र केंद्रप्रमुखांचे नावे पात्र यादीत पाठविलेले नाही.
याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून गटशिक्षणाधिकाऱ्यांना केंद्रप्रमुखांच्या वरिष्ठश्रेणी, निवडश्रेणी, ग्रेड पे बाबत स्पष्टता लक्षात आणून द्यावी, अशी संघटनेमार्फत मागणी करण्यात आली. केंद्रप्रमुख पदापासून १२ वर्ष न झाल्यामुळे वरिष्ठश्रेणीसाठी व २४ वर्ष पूर्ण न झाल्यामुळे निवडश्रेणीसाठी नावे पाठविलेली नाही असे प्रतिउत्तर गटशिक्षणाधिकारी देत आहेत. यामुळे केंद्रप्रमुख वरिष्ठश्रेणीपासून पदविधर केंद्रप्रमुख संयुक्त पदावर सेवेची अटपूर्ण करुन वंचित असल्याचे संघटनेचे म्हणने आहे. निवडश्रेणी सुद्धा पात्र केंद्रप्रमुखांना संभ्रम असल्यामुळेच पाठविलेले नाही हे स्पष्ट होत असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.पात्र केंद्रप्रमुखांचे आर्थिक नुकसान व सेवांतर्गत प्रशिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या षडयंत्राला कारणीभूत कोण, असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश जिल्हा परिषद केंद्रप्रमुख संघ जिल्हाध्यक्ष रामराव हरडे यांनी ुउपस्थित केला आहे. ग्रेड पे कमी करुन वसुली करणे, वेतनवाढ न देणे, प्रवासभत्ता कमी देणे यामुळे केंद्रप्रमुखांमध्ये असंतोष निर्माण झालाआहे. यापूर्वी याच मुद्यावर आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेही दिला आहे. केंद्रप्रमुखांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. (नगर प्रतिनिधी)