उपविभागीय अधिकाऱ्याच्या विरोधात महसूल कर्मचाऱ्यांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:30 AM2021-05-06T04:30:33+5:302021-05-06T04:30:33+5:30

बल्लारपूर : गोंडपिपरी व बल्लारपूर येथील महसूल कर्मचाऱ्यांनी बल्लारपूर येथील उपविभागीय अधिकारी संजय कुमार डव्हळे यांच्या उर्मट वागणुकीची तक्रार ...

Elgar of revenue staff against subdivisional officer | उपविभागीय अधिकाऱ्याच्या विरोधात महसूल कर्मचाऱ्यांचा एल्गार

उपविभागीय अधिकाऱ्याच्या विरोधात महसूल कर्मचाऱ्यांचा एल्गार

Next

बल्लारपूर : गोंडपिपरी व बल्लारपूर येथील महसूल कर्मचाऱ्यांनी बल्लारपूर येथील उपविभागीय अधिकारी संजय कुमार डव्हळे यांच्या उर्मट वागणुकीची तक्रार तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे बुधवारी १९ कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरीनिशी केली आहे.

निवेदनात कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे की, बल्लारपूर उपविभागीय कार्यालयात हे अधिकारी रुजू झाल्यापासून त्यांची कर्मचाऱ्यांबाबत वागणूक ही अत्यंत बेशिस्त व उर्मटपणाची आहे. कर्मचाऱ्यांना वैयक्तिक द्वेष ठेवून धमकावतात, कार्यालयातील महसूल कर्मचारी प्रफुल नारनवरे यांना अनेकदा पेपरवेट फेकून मारण्याचा प्रयत्नही या अधिकाऱ्याने केला. एवढेच नाहीतर, तहसील येथील कर्मचाऱ्यांना बोलावून तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे काम न केल्यास तुमची ड्युटी कोविड केअर सेंटरला लावण्यात येईल, अशी धमकी देतात व एफआयआर करण्याची धमकी देतात. उपविभागीय अधिकारी यांनी ४ मे रोजी गोंडपिपरी येथील नायब तहसीलदार तिराणकर, कंचनवार, राठोड, निकुरे व सुनील चांदेवार या कर्मचाऱ्यांना बल्लारपूर येथे बोलावून घेतले व कोविड रुग्णांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती प्रत्यक्ष जाऊन गोळा करण्यास सांगितली. सुनील चांदेवार यांनी अंशतः कामातून सूट मिळण्याची विनंती केली असता त्यांनी उलट नायब तहसीलदार तेलंग यांना सुनील चांदेवार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यास पात्र तयार करण्यास सांगितले. यामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्याच्या विरोधात एल्गार पुकारला असून, जिल्हाधिकारी यांना तसेच विभागीय महसूल कर्मचारी संघटना यांना निवेदन दिले आहे.

कोट

कोविड संकट काळात सर्व कर्मचाऱ्यांनी काम करणे गरजेचे आहे आणि कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगचे काम फार महत्त्वाचे आहे. परंतु सुनील चांदेवार यांनी काम करण्यास नकार देत मी संघटनेच्या मार्फत बघून घेतो, अशी धमकी दिली. यावरून त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५६, भारतीय दंड संहितेचे कलम ए १८८ व इतर आनुषंगिक कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- संजयकुमार डव्हळे, उपविभागीय अधिकारी, बल्लारपूर.

Web Title: Elgar of revenue staff against subdivisional officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.