चिचाळ्यातील महिलांचा अवैध दारूविरोधात एल्गार
By Admin | Updated: December 22, 2016 01:46 IST2016-12-22T01:46:03+5:302016-12-22T01:46:03+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारुविक्री बंद करण्यात आली. तरी मूल तालुक्यातील चिचाळा येथे अवैध दारुविक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

चिचाळ्यातील महिलांचा अवैध दारूविरोधात एल्गार
एका दिवशी डझनभर दारुविक्रेत्यांना अटक : अनेक दारुविक्रेतचे भूमीगत
भेजगाव: चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारुविक्री बंद करण्यात आली. तरी मूल तालुक्यातील चिचाळा येथे अवैध दारुविक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यात महिला, युवक व आबालवृद्धासह अल्पवयीन मुलेही दारुविक्रीत गुंतले आहेत. त्यामुळे गावाची शांतता भंग पावत आहे. त्यामुळे महिलांनी अवैध दारुविक्रीसाठी सरसावल्या आहेत.
अवैध दारुविक्री रोखण्यासाठी गावात दवंडी देऊन तंटामुक्त समिती व महिला मंडळाची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत गावातील दारुबंदी झाल्यास महिला बचत गटांना पालकमंत्र्यांच्या निधीतून अनुदान मिळणार असल्याचे महिलांना सांगण्यात आले. त्यामुळे महिलांनी आक्रमक होत तंटामुक्त समिती, ग्रामपंचायत व युवकांच्या सहकार्याने अवैध दारुविक्रेत्यांच्याविरोधात धाडसत्र सुरु केले आले. यात तब्बल बारा अवैध दारु विक्रेत्यांना जेरबंद करुन लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर काही दारुविक्रेत्यांनी कारवाईच्या भितीपोटी गावातून पळ काढून भूमिगत झाले आहेत.
यावेळी अरुण ऋषी चलाख, निलेश वासुदेव कोठारे, बाबू झुंगा चलाख, ताराचंद सुकरु चलाख, वर्षा दशरथ चलाख, सुधीर दशरथ दुधबळे, मारोती विलास कोठारे, यांना दारुसह पकडून पोलीस प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आले.
पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने गावात दारुविक्री वाढली होती. त्यामुळे महिला वर्गानी पकडलेला दारुसाठा ग्रा.पं. समोर जाळून टाकण्याचा निर्णय घेतला. यामुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाला. शेवटी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे यांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती आटोक्यात आणली.
चंद्रपूर जिल्हा दारूबंदीचे प्रणेते म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी दारुबंदीच्या घेतलेल्या निर्णयाने महिला सुखावल्या होत्या मात्र पालकमंत्र्याच्या विधानसभा क्षेत्रातील मंत्र्यांनीच दत्तक घेतलेल्या चिंचाळा गावातील दारुच्या महापुराने महिला संतापल्या आहेत.
सदर महिला मंडळामध्ये चिचाळा येथील सरपंच सुषमा सिडाम, उपसरपंच यशवंत चलाख, तंटामुक्त समिती अध्यक्ष वासुदेव बुरांडे, पोलीस पाटील विजय दुर्गे, संगीता चलाख, कुंदा लेनगुरे, गिता उडाण, सुमन लेनगुरे, लता भेंडारे, पुजा सोनुले, अंतकला जेंगठे, माया यापाकुलवार, रंजना सोनटक्के, माधुरी मंकिवार, सरीता कोंतमवार, सारीका रेड्डीवार, पार्वता भेंडारे, प्रविण सिडाम, संजय गेडाम, विलास भुरसे, भाऊराव बागेवार आदींनी सहकार्य केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मनोहर कोरेही, शेंडे कुळमेथे, कुमरे, बल्की आदींनी कारवाई करुन दारुविक्रेत्यांना जेरबंद केले. ( वार्ताहर)