१११ कोटींची विजेची कामे

By Admin | Updated: June 3, 2017 00:30 IST2017-06-03T00:30:42+5:302017-06-03T00:30:42+5:30

केंद्र शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना व एकात्मिक ऊर्जा योजनेतून जिल्ह्यात दीड वर्षात १११ कोटी ४ लाख रुपयांची कामे होणार आहेत.

Electricity works of 111 crores | १११ कोटींची विजेची कामे

१११ कोटींची विजेची कामे

हंसराज अहीर : पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना व एकात्मिक ऊर्जा योजनेतून जिल्ह्यात दीड वर्षात १११ कोटी ४ लाख रुपयांची कामे होणार आहेत. त्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून एकूण १० नवीन उपकेंद्रे उभी राहणार आहेत. तसेच ४६२ नवीन रोहित्र लावण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.
ग्रामीण भागातील फीडर सेपरेशन, वीज वितरण जाळ्यांचे बळकटीकरण, ग्रामीण भागातील उपकेंद्र, रोहित्र दुरुस्ती, मीटर अद्यावतीकरण आदी कामांचा अंतर्भाव आहे. शिवाय अखंडित व योग्य दाबाचा वीजपुरवठा देणे अपेक्षित आहे. जिल्हयात सुरु असलेल्या कामांचा आज आढावा घेण्यात आला. अधीक्षक अभियंता हरीश गजभे यांनी योजनेच्या वाटचाली संदर्भात माहिती दिली. बैठकीला आ. नाना शामकुळे, आ. अ‍ॅड. संजय धोटे, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, वरोरा नगराध्यक्ष एहतेशाम अली, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, जि.प. सभापती अर्चना जीवतोडे, ब्रीजभूषण पाझारे, संतोष तंगरपल्लीवार व गोदावरी केंद्रे तसेच जिल्हा समन्वय समितीचे सदस्य सुशील बोंडे आदी उपस्थित होते. एकात्मिक ऊर्जा विकास योजनादेखील केंद्र शासनाची शहरी भागातील वीज विषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता सुरु करण्यात आलेली योजना असून त्यामधून चंद्रपूर, मूल, भद्रावती, वरोरा, बल्लारपूर, राजूरा व ब्रह्मपुरी या शहरांचा समावेश आहे. या योजनेतून भूमिगत केबल टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. १८ महिन्यांमध्ये ही योजना पूर्ण करायची आहे.

पावसाळ्यासाठी आपातकालीन योजना करा
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी योजनेची आढावा बैठक घेतली. तसेच जिल्हा विद्युत समितीची बैठक विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ना. अहीर म्हणाले की, महाराष्ट्राला विजेचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत होत नसेल तर लोकप्रतिनिधींची काळजी योग्य ठरते. महावितरणने आपल्या उपलब्ध मनुष्यबळातून नियोजन करुन पावसाळयासाठी आपातकालीन योजना तायर करून तिच्या अंमलबजावणीची आठवड्याभरात व्यवस्था करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

Web Title: Electricity works of 111 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.