ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव थांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2016 00:33 IST2016-10-25T00:33:48+5:302016-10-25T00:33:48+5:30
ग्रामीण भागात नेहमी विजेचा लपंडाव सुरु असतो. त्यावर निर्बंध घालण्यासाठी राज्य सरकारने कोशल्य विकास योजनेतंर्गत नुकतीच ‘एक गाव, एक ग्राम विद्युत व्यवस्थापक योजना’ राबविण्याची घोषणा केली आहे.

ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव थांबणार
अनेकांना मिळणार रोजगार : ‘एक गाव, एक ग्राम विद्युत व्यवस्थापक’ योजना
परिमल डोहणे चंद्रपूर
ग्रामीण भागात नेहमी विजेचा लपंडाव सुरु असतो. त्यावर निर्बंध घालण्यासाठी राज्य सरकारने कोशल्य विकास योजनेतंर्गत नुकतीच ‘एक गाव, एक ग्राम विद्युत व्यवस्थापक योजना’ राबविण्याची घोषणा केली आहे. त्यानूसार राज्यातील २३ हजार ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकी एक असा विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव थांबण्यास मदत होईल.
ग्रामीण भागात कर्मचारी स्थानिक राहत नसल्यामुळे नेहमीच विजेचा लपंडाव सुरु असतो. बहुतेकदा तर दोन-दोन दिवस वीज येत नाही. परिणामी अनेक कामे खोळंबली जातात. त्यामुळे राज्य शासनानाने ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक उमेदवाराची निवड विद्युत व्यवस्थापक म्हणून करण्यात येत असल्यामुळे ग्रामीण भागातील विजेचा प्रश्न सुटणार आहे. तसेच या योजनेतून अनेकांना रोजगारसुद्धा मिळणार आहे.
विद्युत व्यवस्थापक म्हणून गावातील वीजतंत्री आयटीआय झालेला किंवा गावात विद्युतचे काम करणाऱ्या व्यक्तीला विद्युत व्यवस्थापक म्हणून नेमण्यात येणार आहे. विद्युत व्यवस्थापकाकडे वीज दुरुस्ती करणे, वीज पुरवठा खंडीत करणे, फ्युज कॉल तक्रारीचे निवाकरण करणे, पथदिव्यांची देखभाल करणे, ब्रेकडाऊन अटेंड करणे, फ्यूज टाकणे आदी कामे विद्युत व्यवस्थापकाला करावी लागणार आहे.
विद्युत व्यवस्थापकाला मानधन म्हणून प्रती कु टुंब नऊ रुपये याप्रमाणे रुपये देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेकांना रोजगार प्राप्त होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव एक गाव, एक ग्राम विद्युत योजनेमुळे थांबणार आहे.
अनेक बेरोजगारांना
मिळणार रोजगार
एक गाव, एक विद्युत व्यवस्थापक या योजनेतंर्गत राज्यातील संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये विजेचा लपंडाव थांबविण्यासाठी विद्युत व्यवस्थापकांची निवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये गावातील वीजतंत्री आयटीआय झालेला युवकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळणार आहे.