इलेक्ट्रिक काटा व भंगार चोरट्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:33 IST2021-08-14T04:33:35+5:302021-08-14T04:33:35+5:30

यातील शुभम संजय चक्रवती (३०) रा. फुकट नगर भद्रावती असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यासोबत दोन विधिसंघर्ष बालक ...

Electric fork and scrap thieves arrested | इलेक्ट्रिक काटा व भंगार चोरट्यांना अटक

इलेक्ट्रिक काटा व भंगार चोरट्यांना अटक

यातील शुभम संजय चक्रवती (३०) रा. फुकट नगर भद्रावती असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यासोबत दोन विधिसंघर्ष बालक आरोपी आहे. निशांत झंझाड हे व्यापारी गावाला गेले असता त्यांच्या गोडाऊनमधून इलेक्ट्रिक वजन व काटा लोखंडी खिडकी, दरवाजा व इतर भंगार किंमत १६ हजार हे चोरट्यांनी चोरून नेले होते. या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसांना देण्यात आली. या घटनेचा पोलिसांनी तपास करून शुभमसह अन्य विधी संघर्ष दोन बालकांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गेल्या काही दिवसांत झालेल्या चोरीचा उलगडा लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई ठाणेदार सुनीलसिंग पवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार, केशव चिटगिरे, हेमराज प्रधान यांनी केली.

130821\img-20210812-wa0077.jpg

इलेक्ट्रिक काटा व भंगार चोरट्यांना अटक

Web Title: Electric fork and scrap thieves arrested