ग्रामपंचायत निवडणुकीत सिंदेवाही तालुक्यात काँग्रेसला घवघवीत यश
By Admin | Updated: September 16, 2015 00:55 IST2015-09-16T00:55:20+5:302015-09-16T00:55:20+5:30
तालुक्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंचाच्या निवडणुका पार पडल्या.

ग्रामपंचायत निवडणुकीत सिंदेवाही तालुक्यात काँग्रेसला घवघवीत यश
सिंदेवाही : तालुक्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंचाच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये काँग्रेसने २५ पैकी १९ ग्रामपंचायतीवर ताबा मिळविला आहे. तर भाजपाला चार, अपक्षाला दोन जागा मिळाल्या आहे.
काँग्रेस पक्षाचे सरपंच विराजमान झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये खातगाव येथे सरपंचपदी नामदेव वरखडवार, उपसरपंच जास्मिना नेवारे, रत्नापूर येथे सरपंच सदाशिव मेश्राम, उपसरपंच उद्धव तोंडफोडे, सामदा (खुर्द) येथे सरपंच मंदा जुमनाके, उपसरपंच वासुदेव बोरकर, कळमगाव (तु.) येथे सरपंच यादव मगरे, उपसरपंच होमेश्वर मगरे, कुकडहेटी येथे सरपंच रागिना लेनगुरे, उपसरपंच मधुकर गुरनुले, कारव्हा येथे सरपंच लवकुश पुसाम, उपसरपंच माधव आदे, सरडपवार येथे सरपंच कल्पना साखरे, उपसरपंच अरविंद सिडाम, चारगाव (ब) येथे सरपंच संगीता कावठे, उपसरपंच रमेश कांबळी, किन्ही येथे सरपंच शालु मेश्राम, उपसरपंच शेवंता गुरनुले, आलेसूर येथे सरपंच वंदना घोडाम, उपसरपंच दिवाकर खोब्रागडे, मुरमाडी येथे सरपंच रुपाली रत्नावार, उपसरपंच श्रीधर सोनवाणे, चिकमारा येथे सरपंच कमल नैताम, उपसरपंच जयपाल पेंदाम. कन्हाळगाव येथे सरपंच उर्मिला इंदोरकर, उपसरपंच मनोहर मोहुर्ले. लोनखैरी येथे माया बगडे, उपसरपंच सरिता नागदेवते, विरव्हा येथे सरपंचपदी अंकिता वलके, उपसरपंच दादाजी ठोक, कळमगाव येथे सरपंच आशा गेडाम, उपसरपंच उत्तम नन्नावरे, मोहाळी येथे सरपंच सुनीता दोडके, उपसरपंच काशिनाथ श्रीरामे, रामाळा येथे सरपंच वर्षा गरमळे, उपसरपंच आशा चौधरी यांची निवड झाली.
तर भेंडाळा येथे अपक्षाचे सरपंच निरंजना आत्राम, उपसरपंच प्रशांत बन्सोड, वानेरी येथे सरपंचपदी योगीता कामडी, उपसरपंच वैभव पाकमोडे तर गडबोरी येथे भाजपाचे सरपंच कमलाकर जवळे, उपसरपंच संतोष पेंचलवार. देलनवाडी येथे सरपंच श्रीराम डोंगरवार, उपसरपंच गुरुदास गरमळे, गुुंजेवाही येथे सरपंच सिंधू बारसागडे, उपसरपंच परशुराम तोरे, नवेगाव येथे सरपंच मोसंबा आत्राम, उपसरपंच जिवन कोठेवार यांची निवड झाली. (शहर प्रतिनिधी)