शिक्षिका निवडणूक प्रक्रियेत, तरीही विनयभंगाच्या तक्रारीचा आरोप
By Admin | Updated: May 21, 2017 00:37 IST2017-05-21T00:37:10+5:302017-05-21T00:37:10+5:30
शालिनी कुळाराम चौधरी यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक तक्रारीत नमूद तारखेला ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत मतदान केंद्रावर होते.

शिक्षिका निवडणूक प्रक्रियेत, तरीही विनयभंगाच्या तक्रारीचा आरोप
जयदास सांगोडे : तक्रारी निरर्थक असल्याचे विभागीय उपायुक्तांचे पत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शालिनी कुळाराम चौधरी यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक तक्रारीत नमूद तारखेला ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत मतदान केंद्रावर होते. तसेच त्या दोन्ही दिवशी शाळेला सुटी होती. तेव्हा त्या शिक्षिकेचा विनयभंग केल्याची तक्रार करण्यात आली आहे. ती तक्रार बिनबुडाची व खोटी आहे, असा दावा शिक्षक जयदास सांगोडे यांनी केला आहे.
सांगोडे यांनी म्हटले की, १६ आॅगस्ट २०११ रोजी या शिक्षिकेने मी मुख्याध्यापक असताना कार्यालयात बोलावून विनयभंग व शरीरसुखाची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्या दिवशी शाळेत तक्रारकर्त्या शिक्षिकेसह दोन शिक्षिका व दोन पुरूष शिक्षक उपस्थित होते. त्याच तक्रारकर्ती शिक्षिकेने २ जानेवारी २०१२ रोजी जयदास सांगोडे उत्तम मुख्याध्यापक असल्याचे बयाण दिले आहे. विभागीय उपायुक्त कमलकिशोर फुटाणे यांनी ४ मार्च रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देऊन त्यामध्ये शालिनी चौधरी यांनी पुन्हा सादर केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने फेरचौकशी न करता वारंवार त्याच मुद्याला अनुसरून निरर्थक तक्रार करीत असल्यास त्यांना ताकीद देण्यात यावी, असे फुटाणे यांनी कळविले आहे.
या शिक्षिकेने शाळेतील सर्व शिक्षिकांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन २० आॅक्टोबर २०१५ रोजी बदली करण्याची मागणी केली होती. त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीची चौकशी समितीमार्फत १ मार्च २०१६ रोजी करण्यात आली. ती तक्रार निरर्थक व खोटी असल्याचे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १८ जून २०१६ रोजी म्हटले आहे. केवळ द्वेषभावनेतून तक्रार केल्याचा आरोप सांगोडे यांनी केला आहे.