ब्रहम्पुरीत ७० ग्रामपंचायतीत निवडणूकीची रणधुमाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:38 IST2020-12-30T04:38:44+5:302020-12-30T04:38:44+5:30
ब्रह्मपुरी : तालुक्यातील ७० ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहेत. यासाठीगावपुढारी जोमाने कामाला लागले आहे. मात्र सरपंच होणाऱ्यांसाठी ही निवडणूक प्रतिक्षेची ...

ब्रहम्पुरीत ७० ग्रामपंचायतीत निवडणूकीची रणधुमाळी
ब्रह्मपुरी : तालुक्यातील ७० ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहेत. यासाठीगावपुढारी जोमाने कामाला लागले आहे. मात्र सरपंच होणाऱ्यांसाठी ही निवडणूक प्रतिक्षेची ठरत असल्याने असे उमेदवार जपून पाऊल टाकत आहेत.
७० ग्रामपंचायतीमध्ये एकूण ९६ हजार ३५१ मतदार आहे. निवडणूकीची धुरा १ हजार १०० अधिकारी व कर्मचाऱ्यांवर असून प्रशासनाने तयारी पूर्ण केला आहे. तालुक्यात मोठ्या ग्रामपंचायतमध्ये निवडणूक चूरशीच्या होण्याची शक्यता आहे. गांगलवाडी,चौगाण, मुडझा, मेंडकी, अर्रेऱ्ह नवरगाव, पिंपळगाव, पारडगाव, तोरगाव, अड्याळ (जाणी), खेडमक्ता, जुगनाळा, बेटाळा, रनमोचन, हळदा, आवळगाव,एकारा आदी गावात वातावरण चांगलेच तापले आहे.
बाॅक्स
४१ उमेदवारांचे अर्ज दाखल
तालुक्यात ७० ग्रामपंचायतीसाठी सदस्य संख्या एकूण ५८८ आहे.परंतु उमेदवारी नामांकन दाखल होण्यासाठी पाहिजे तसा वेग अद्यापही वाढला नाही. सोमवारपर्यंत ४१ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले आहे.