ई-लर्निंग लोकार्पण सोहळा

By Admin | Updated: April 7, 2016 00:41 IST2016-04-07T00:41:15+5:302016-04-07T00:41:15+5:30

जिल्हा परिषद शाळा नंदोरी येथे ई-लर्निंग लोकार्पण सोहळा व शैक्षणिक साहित्य जत्रा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ELearning Publications ceremony | ई-लर्निंग लोकार्पण सोहळा

ई-लर्निंग लोकार्पण सोहळा

नंदोरी : जिल्हा परिषद शाळा नंदोरी येथे ई-लर्निंग लोकार्पण सोहळा व शैक्षणिक साहित्य जत्रा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
लोकसहभागातून एक लाख रुपयांचा निधी गावकरी व दात्यांनी शाळेकरिता समर्पित केला आहे. पहिल्या टप्प्यात एका संचाची व्यवस्था केली असून वाढीव संचाबरोबरच आयएसओ पातळी गाठायची आहे, असा मनोदय व्यक्त करण्यात आला. ई-लर्निंगच्या शुभारंभासोबतच शैक्षणिक साहित्य जत्रेचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी रंगनाथ स्वामी पतसंस्था वरोराचे संचालक परीक्षित एकरे, भाजपा तालुका महामंत्री नरेंद्र जीवतोडे, जिल्हा परिषद सदस्य अर्चना जीेवतोडे, सरपंच अनुराधा पिंपळकर, उपसरपंच भानुदास ढवस, शाळा सुधार व्यवस्थापन कमेटी अध्यक्ष नीता कुळसंगे, शाळा सुधार व्यवस्थापन कमेटी सदस्य पंढरी एकरे, मंगेश भोयर, ग्राम विकास अधिकारी अजय कटाईत, दीपक वैरागडे तथा सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सुमधूर स्वागतगीतानंतर दीप प्रज्वलन करीत जिल्हा परिषद सदस्य अर्चना जीवतोडे यांनी ई-लर्निंगचे उद्घाटन केले. शैक्षणिक साहित्य जत्रा या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या. प्राणी व त्यांचे उपयोग, उद्योग व शैक्षणिक साहित्य तसेच लोककलेचे प्रतीक असलेले तुणतुणे तयार करण्यात आले होते. काळात ओघात पडद्याआड जाणाऱ्या लोककलेला सजीवपणा आलेला होता. धान्य दुकान, गणितीय मापे, क्रमवार लावलेल्या टाकाऊ प्लेटस व त्यावरील क्रमवार असणारे महिने, शिंपले व सजविलेली काटेरी झुडपे, अशी एक ना अनेक कल्पकता शैक्षणिक जत्रेत विद्यार्थ्यांनी साकारली होती. दरम्यान, परीक्षित एकरे, अर्चना जीवतोडे, नरेंद्र जीवतोडे आदी दात्यांचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. तसेच असे उपक्रम राबविल्यास मागे पडणार नाही. तसेच मराठी शाळा सदा अग्रेसर राहील, अशी ग्वाही परीक्षित एकरे यांनी आपल्या वक्तव्यातून दिली. तर, ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी संधीचे सोन करावे याबाबत सरपंच अनुराधा पिंपळकर यांनी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)

Web Title: ELearning Publications ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.