जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आठ लिपिक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:12 IST2021-01-13T05:12:37+5:302021-01-13T05:12:37+5:30
चंद्रपूर : जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना वेतनपोटी २७ लाखाची अतिरिक्त रक्कम अदा करणाऱ्या आठ कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी ...

जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आठ लिपिक निलंबित
चंद्रपूर : जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना वेतनपोटी २७ लाखाची अतिरिक्त रक्कम अदा करणाऱ्या आठ कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी तडकाफडकी निलंबित केले. या कारवाईने जि.प. प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्यासाठी राज्य शासनाने निकष तयार केले आहेत. यानुसारच दरमहा वेतन काढण्याची जबाबदारी संबंधित लिपिकांची आहे. मात्र. आरोग्य विभागातील लिपिकांनी नियमाकडे कानाडोळा करून तब्बल २७ लाखाचे अतिरिक्त वेतन अदा केले. अदा केलेल्या वेतनाबाबत शंका आल्याने या विभागातील अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. नियमांना डावलून वेतन अदा केल्याचे या चौकशीदरम्यान सिद्ध झाले.
यामुळे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी त्या आठ लिपिकांना तडकाफडकी निलंबित केले.
लिपिकांकडून १३ लाखाची वसुली
दरमहा वेतन अदा करण्याचे निकष धाब्यावर ठेवणारे आठ लिपिक चौकशीत दोषी आढळले. त्यामुळे सर्वांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. शिवाय, सोमवारपर्यंत १३ लाखाची वसुलीही करण्यात आली. उर्वरित १४ लाखाची रक्कमही लवकरच वसूल केली जाणार आहे.
कोट
वेतन काढताना नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे आरोग्य विभागाच्या आठ लिपिकांना निलंबित केले. या प्रकरणाची सखोल चौकशीही केली जात आहे.
- राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. चंद्रपूर