जिल्ह्यात ठिकठिकाणी ईद साजरी
By Admin | Updated: December 27, 2015 01:32 IST2015-12-27T01:32:13+5:302015-12-27T01:32:13+5:30
ईदनिमित्त चंद्रपुरात मुस्लिम बांधवांनी रॅली काढली. कमला नेहरून कॉम्पलेक्स समोरील आझाद उर्दू शाळेजवळील चौकात चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी,

जिल्ह्यात ठिकठिकाणी ईद साजरी
चंद्रपूर: जिल्ह्यात ठिकठिकाणी ईद साजरी करण्यात आली.
चंद्रपूर
ईदनिमित्त चंद्रपुरात मुस्लिम बांधवांनी रॅली काढली. कमला नेहरून कॉम्पलेक्स समोरील आझाद उर्दू शाळेजवळील चौकात चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी, विदर्भ किसान मजदूर कॉंगे्रस, एनएसयूआय या संघटनांसह कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रॅलीचे स्वागत केले. यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे माजी महासचिव तथा युवा नेते राहुल पुगलिया यांच्या नेतृत्वात स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व प्रथम अली जनाब मौलाना व अलीम साहब यांचे चंद्रपूर शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, राहुल पुगलिया व अन्य पदाधिकाऱ्यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर रॅलीतील सहभागी मुस्लिम बांधवांना आईसक्रीम व पाणी पाऊचचे वाटर करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ.सुरेश महाकुलकर, चंद्रपूर जिल्हा कॉंग्रेसचे महासचिव तथा नगरसेवक अशोक नागापुरे, प्रवीण पडवेकर, रमजान अली सय्यद, चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे गटनेते प्रशांत दानव, कॉंग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र बेले, सुधाकरसिंह गौर, संजय महाडोळे, नगरसेवक तथा उपगटनेते महेंद्र जयस्वाल, नगरसेवक राजेश रेवलीवार, देवीदास गेडाम, श्रीनिवास पारनंदी, उषा धांडे, शकीना अंसारी, विणा खनके, मन्ना त्रिवेदी, कुशल पुगलिया, महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयचे उपाध्यक्ष रोशनलाल बिटा, दुर्गेश चौबे, एनएसयूआयचे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील तिवारी, मोंटू मानकर, कृष्णा यादव, गौस शेख, अरूण बुरडकर, दर्शन बुरडकर, विनोद पिंपळशेंडे, बापू अन्सारी, हबीबभाई मेमन, अस्लमभाई, ताजुभाई, गफ्फारभाई, रामदास वागदरकर, गजानन दिवसे, अनिल तुंगीडवार, विरेंद्र आर्य, बाबुलाल करूणाकर, सुधाकर चन्ने, मेजर सातपुते, दिगांंबर लोडेलीवार यांच्यासह कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
बल्लारपूर
बल्लारपुरातही भाजपा अल्पसंख्यक आघाडीचे उपाध्यक्ष यांच्या पुढाकारात उत्साहात ईद साजरी करण्यात आली. ईदच्या पूर्वसंध्येला भाजपा नेते चंदनसिंह चंदेल, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, जामा मस्जिदचे अध्यक्ष हाजी शेख उस्मान, अर्जून नाथानी, शेख ईलीयास यांच्या प्रमुख उपस्थितीत गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी भाजपा अल्पसंख्यक सेलचे शेख जुम्मन रिजवी, शेख लाल, असरार अहेमद खान, वसीम खान, अब्दुल खलील, अब्दुल जमिल, हारूनभाई अब्दूल समर, अलसमभाई, शेख ईमरान, शेख आशिक, ुमुस्ताक खान, ईलियासभाई, शेख हबीब, जुनेद कच्छी, शेख युसूफ, सलिम मिर्झा बेग, शेख अजर, शेख जाकीर, अब्दुल वकील, शेख कुरबान, अरमान, शेख करीम यांनी परिश्रम घेतले. याचनिमित्ताने २४ डिसेंबरला मुस्लीम बांधवांच्यावतीने बल्लारपुरातील रेल्वे चौकात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित होते.
राजुरा
ईदनिमित्त मुस्लीम बांधवांच्यावतीने आझाद चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. मुस्लीम बांधवांत रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी, या दृष्टिकोनातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सुशीलकुमार नायक, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, न.प.सदस्य सखावत अली यांनी भेट दिली. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी सैयद जावेद अली, शीबर अली, महंमद जावेद, सैय्यद यकीन, सैय्यद मुसरत अली, सैय्यद अनवर अली, मोहसिन कुरेशी, आरिफ खान पठाण, अब्दुल शायाब, महंमद जुनेद, मुस्ताक कुरेशी आदींनी परिश्रम घेतले.