दुर्बल घटकांच्या योजना प्रभावीपणे राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 23:35 IST2018-02-22T23:34:38+5:302018-02-22T23:35:36+5:30

प्रधानमंत्री आवास योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहे. पात्र व्यक्ती योजनेपासून वंचित राहू नये सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी, असे मत मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी दिली.

Effectively implement the schemes of weaker sections | दुर्बल घटकांच्या योजना प्रभावीपणे राबवा

दुर्बल घटकांच्या योजना प्रभावीपणे राबवा

ठळक मुद्देराहुल पावडे : प्रधानमंत्री आवास योजनांचा आढावा

ऑनलाईन लोकमत
चंद्रपूर : प्रधानमंत्री आवास योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहे. पात्र व्यक्ती योजनेपासून वंचित राहू नये सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी, असे मत मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी दिली. प्रधानमंत्री आवास योजना आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहरे, शहर अभियंता महेश बारई, शाखा अभियंता बोरीकर उपस्थित होते.
प्रधानमंत्री आवास योजना जून २०१५ मध्ये सुरु करण्यात आली आहे. नऊ राज्यातील ३५ शहरांत योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील गरीबांसाठी ही योजना उपयुक्त ठरली आहे. सर्वांसाठी घरे ही संकल्पना घेवून चंद्रपूर शहरातही अंमलजवाणी केली आहे.
या योजना उद्देश गरीब शहरी लोकांसाठी परवडणारी आहे. योजनेअंतर्गत घरे बांधून देण्यासाठी शहरात सर्वेक्षण करण्यात आले. शहरी गरीब, आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचा समावेश आही. चंद्रपुरातील घरे २०२२ पर्यंत बांधली जाणार आहेत. लाभार्थ्यांना केंद्राचे अनुदान प्रती घरकुल दीड लाख आणि राज्य शासनाचे एक लाख रुपये देण्यात येणार आहे, अशी माहिती सभापती पावडे यांनी दिली. या बैठकीत योजनेची गती वाढविण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत संबंधित लाभार्थ्यांची कागदपत्रे तसेच योजनेची कागदपत्रे तयार ठेवावी. कागदपत्रांची पाहणी करून प्रभानिहाय कट आॅफ लिस्ट तयार केली जाणार आहे. मनपातील संबंधित अधिकारी ही योजना नगरसेवक व जनतेला सोप्या भाषेत समजावून सांगणार आहेत. प्रत्येक प्रभागातून किती लोकांनी योजनेसाठी अर्ज केले. कट आॅफ लिस्टद्वारे किती अर्जांना मंजुरी देण्यात आली, याची प्रभागनिहाय यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक वॉर्डातील जागांचेही सर्वेक्षण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Web Title: Effectively implement the schemes of weaker sections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.