हिवताप व डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:20 IST2021-07-18T04:20:45+5:302021-07-18T04:20:45+5:30
डेंग्यू डासाच्या अळीची उत्पत्ती घरगुती पाण्याच्या भांड्यांत होत असल्याने आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. जनतेने वापरावयाची पाण्याची भांडी ...

हिवताप व डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवा
डेंग्यू डासाच्या अळीची उत्पत्ती घरगुती पाण्याच्या भांड्यांत होत असल्याने आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. जनतेने वापरावयाची पाण्याची भांडी कोरडी करून त्यात पाणी भरावे. पाणी साठे झाकून ठेवण्याबाबत किंवा कपड्याने झाकण्याबाबत लोकांना सूचना द्याव्यात. नगर परिषद, नगर पंचायतीमध्ये उपलब्ध कर्मचाऱ्यांमार्फत शहरातील नाल्यांमध्ये अळीनाशक फवारणी तसेच एडिस डास आढळलेल्या दूषित पाणी साठ्यांमध्ये (पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त) टेमिफॉस अळीनाशक टाकण्याची कार्यवाही करावी. धूर फवारणीसाठी आवश्यक असलेला औषधीसाठा उपलब्ध ठेवावा, डेंग्यू व चिकुनगुनिया या आजाराच्या प्रार्दुभावामध्ये प्रौढ डासांचा प्रतिबंध करण्यासाठी धूर फवारणी हे प्रभावी माध्यम असल्याचे जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी सांगितले.
धूर फवारणीचे पर्यवेक्षण करा
रोगांचा प्रसार, रोगप्रतिबंध व विशेष करून मृत्यू टाळण्यासाठी रुग्णांना सरकारी, ग्रामीण, उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी जनजागृती करावी.
लोकप्रतिनिधींचा सहभाग घ्यावा. पाणीपुरवठा व स्वच्छता समितीमध्ये ठराव घेऊन कटाक्षाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. गावातील, शहरातील निरोपयोगी विहिरी डासोत्पत्ती स्थानात डासअळी भक्षक गप्पी मासे सोडावेत आणि धूर फवारणीसाठी पर्यवेक्षण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी दिल्या.