शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

By admin | Updated: December 13, 2014 01:22 IST

भटाळी येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

चंद्रपूर : भटाळी येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.या शाळेत सद्यस्थितीमध्ये एक ते आठपर्यंत वर्ग आहे. शाळेची पटसंख्या ११८ असून शिक्षक संख्या रेकॉर्डवर सहा आणि प्रत्यक्षात पाच अशी आहे. शासनाच्या नियमानुसार ११८ विद्यार्थ्यांना सहा शिक्षकांची गरज आहे. पण भटाळी शाळेत प्रत्यक्षात पाच शिक्षकच एक ते आठ वर्गातील विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाचे काम करीत आहेत. मागील दोन वर्षांपूर्वी येथील एक शिक्षिका निलंबित झाली आहे. त्यामुळे तिचे हजेरीपटावर नाव आहे. शासनाकडून तिला वेतनही मिळत आहे. परंतु ती जागा भरता येत नाही, असे कार्यालयाचे म्हणणे आहे. त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यावर होत आहे, ही बाब मात्र जि.प. च्या लक्षात येत नाही. शिक्षकाची कमतरता लक्षात घेऊन मागील सत्रापासून शिक्षकाची मागणी करणारे पत्रसुध्दा दिले. परंतु गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक देतो, असे तोंडी तात्पुरते आश्वासन देऊन शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांना चूप केले. त्यानंतर शाळा समितीचे सदस्य सुभाष गौरकार यांनी शिक्षणाधिकारी यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी सुद्धा समायोजनानंतर तुम्हाला एक शिक्षक देण्यात येईल, असे सांगून विषय तेथेच थांबविला. त्याचवेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यापुढेही समस्या मांडण्यात आली. त्यांनी सुद्धा चंद्रपूर जिल्हा परिषदेकडे भटाळी शाळेला एक शिक्षक देण्यात यावा, असे पत्र दिले. त्यानंतर आॅगस्ट महिन्यात समायोजन झाले. निलंबित शिक्षिकेच्या जागेवर एका शिक्षकाचे समायोजन करण्यात आले. शाळेत आदेश प्राप्त झाला. परंतु ते शाळेत रूजू झाले नाही. आणि हा प्रवास इथेच थांबून आहे. एकूणच या साऱ्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक थांबलेले नाही. याकडे प्रशासनाचे लक्ष नसून यामध्ये आर.टी.एफ. च्या बट्याबोळ होत आहे. एकीकडे शासन प्राथमिक शिक्षणाकडे अधिकाधिक लक्ष पुरवून विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करीत असल्याचा खोटा गवगवा करीत आहे. प्रत्यक्षात मात्र खेडोपाडी शाळेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे विदारक चित्र आहे. वारंवार मागणी करूनही शिक्षक देत नाही, शिक्षक दिला तर त्यांना भारमुक्त करीत नाही. याला कोणते प्रशासन म्हणायचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शेवटी पर्याय उरला नाही नाही.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून शाळा व्यवस्थापन समितीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. येत्या १५ दिवसांत शिक्षक मिळाला नाही तर शाळेला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा सुभाष गौरकार माजी पं.स. सदस्य यांनी दिला आहे. आता जि. प. प्रशासन गावकऱ्यांच्या या इशाऱ्याची कशी दखल घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)