शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीपूर्व अटकेच्या निषेधार्थ शिक्षण विभागातील अधिकारी सामूहिक रजेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 12:48 IST

शालार्थ आयडी प्रकरण : फायलींचा वाढला ढीग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बोगस शालार्थ आयडीप्रकरणी नागपूर येथील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना चौकशीपूर्व अटक केल्याच्या निषेधार्थ अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने राज्यभर सामूहिक रजा आंदोलन सुरू केले आहे. ८ ऑगस्टपासून सुरू असलेल्या या आंदोलनाचे पडसाद सोमवारी (दि. ११) ही उमटले, परिणामी, राज्यभरातील शिक्षण विभागाचे कामकाज ठप्प झाले. शासनस्तरावर तोडगा न निघाल्याने हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्हास्तरावर शालेय कामकाजाच्या फायलींचा ढीग वाढत असून, या आंदोलनात राज्यभरातील चारशेहून अधिक अधिकारी सहभागी झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

बोगस शालार्थ आयडी प्रकरणात शिक्षण विभागातील उपसंचालक आणि अन्य अधिकाऱ्यांना कोणतीही चौकशी न करता थेट अटक केल्याने गट-अ अधिकाऱ्यांमध्ये संताप आणि असुरक्षिततेची भावना पसरली आहे. या पार्श्वभूमीवर अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव आणि शिक्षण आयुक्त यांना लिखित निवेदन देत, चौकशीपूर्व अटकेपासून संरक्षणाची लेखी हमी मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. संघटनेचे शिष्टमंडळ मंगळवारी मुंबईत शालेय शिक्षणमंत्री आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव यांच्याशी चर्चा करणार असून, या चर्चेत तोडगा निघतो का याकडे शिक्षण विभागाचे लक्ष लागले आहे.

सामूहिक रजा आंदोलनामुळे कामकाजावर परिणामशिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन सुरू केले आहे. त्याचा परिणाम शालेय कामकाजावर होत आहे.शिक्षण अधिकारी अथवा वेतन पथक अधीक्षक वेतन बिलावर स्वाक्षरी करणार नसल्याचे संघटनेचे म्हटले आहे.

या आहे मागण्याकुठल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विनाचौकशी अटक करू नये, शालार्थबाबतची सर्व प्रकरणे शासन निर्णय ७ ऑगस्ट २०२५ द्वारे स्थापन एसआयटीकडे वर्ग करण्यात यावी, अपुरे मनुष्यबळ, भौतिक सुविधा तसेच सुटीच्या दिवशीचा अतिरिक्त कामाचा ताण यावर शासनाने ठोस निर्णय घ्यावा.

टॅग्स :nagpurनागपूर