वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी इको-प्रोचे निदर्शने

By Admin | Updated: December 8, 2014 22:32 IST2014-12-08T22:32:55+5:302014-12-08T22:32:55+5:30

शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. जटपुरागेट परिसरात तर वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनधारक तसेच पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी

Eco-Pro demonstrations to solve traffic problems | वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी इको-प्रोचे निदर्शने

वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी इको-प्रोचे निदर्शने

चंद्रपूर : शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. जटपुरागेट परिसरात तर वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनधारक तसेच पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करावी या मागणीला घेऊन सोमवारी इको-प्रोच्या सदस्यांनी जटपुरागेटवर चढून निदर्शने केले. त्यानंतर आमदार, उपायुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेमध्ये अरुंद रस्ते आहे. विशेष म्हणजे, जटपुरा गेटपरिसरात वाहतुकीची कोंडी होते. यात वाहनधारकांना प्रदूषणाचाही मारा सहन करावा लागतो. यामुळे अनेकांना आजार होत आहे. या कोंडीमुळे अनेकवेळा रुग्णवाहिकाही अडकत असल्याने रुग्णाचा जीव गमविण्याची वेळ येते. अनेकवेळा वाहन समोर जाण्याची कोणतीही शास्वती नसते. त्यामुळे येथील समस्या कोयमस्वरुपी सोडवावी, अशी मागणी करीत इको-प्रोच्या सदस्यांनी निदर्शने केले. त्यानंतर इकोप्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी आमदार नाना शामकुळे, उपायुक्त राजेश मोहीते यांना निवेदन सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांना भेटून समस्या सोडविण्याची मागणी केली.
जिल्हा प्रशासनाने व नगर प्रशासनाने बैठक बोलावून यात शहरातील विविध तज्ज्ञांनी सुचविलेल्या वेगवेगळ्या उपाययोजना प्रेजेन्टेशनच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात यावे यापैकी एक पर्र्याय निवड करून येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्याकरिता प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली. इको-प्रोचे नितीन रामटेके, नितीन बुरडकर यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने सदस्यांनी आंदोलन केले.
(नगर प्रतिनिधी)

Web Title: Eco-Pro demonstrations to solve traffic problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.