शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

थंडीत गाजर खाल्ल्याने डोळ्यांपासून केसांपर्यंत फायदेच फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 15:19 IST

मोठ्या प्रमाणात आवक : आरोग्यासाठीही तेवढाच फायदेशीर

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : खाण्यापिण्याची खरी मजा हिवाळ्यात असते. कारण, हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन होत असून, दरही माफक राहत असल्याने नागरिकांना खरेदी करताना अडचण होत नाही. विशेष म्हणजे, यामध्येच सध्या गाजरची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने दररोजच्या सलादमध्ये प्रत्येकच घरात गाजरचा वापर केला जात आहे. शिवाय गाजरचा हलवा म्हणताच तोंडाला पाणी सुटते. सुका मेवा टाकून तयार केलेला गाजरचा हलवा खाण्यासाठी जेवढा चविष्ट तेवढाच आरोग्यासाठी फायद्याचा आहे. त्यात सध्या गाजरचे दर कमी असल्याने होऊन जाऊ द्या, गाजरचा हलवा, असे म्हटले जात आहे. 

गाजर हे एक पौष्टिक कंदमूळ आहे. ज्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. शिवाय गाजरात ९५ टक्के पाण्याचे प्रमाण असते. ज्यामुळे गाजर खाण्यामुळे तुम्ही हायड्रेट राहता. शिवाय गाजरात व्हिटॅमिन-ए, बायोटिन, व्हिटॅमिन-के, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी ६. बीटा कॅरेटीन, अल्फा कॅरेटीन, ल्यूटेन, लायकोपेन असते, जे फायदेशीर ठरते.

गाजर खाण्याचे फायदे 

  • गाजरात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ए, बी, सी, डी आणि र्ड असल्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते. 
  • गाजरातील बिटा केरोटीन आणि कॅरोटेनॉडमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि कॅन्सरच्या पेशींना प्रतिबंध करणे सोपे जाते. 
  • गाजरात फायबर्स, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी असे अनेक पोषक घटक असतात. ज्यांचा रक्तदाबावर चांगला परिणाम होतो. 
  • गाजरात व्हिटॅमिन-ए मुबलक असल्यामुळे मधुमेहींसाठी गाजर खाणं नेहमीच फायद्याचे ठरते.
  • रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी गाजरामधील व्हिटॅमिन ए फायदेशीर ठरते, म्हणूनच आहारात गाजराचा समावेश करा. 
  • गाजरातील बिटा कॅरोटीनमुळे तुमच्या शरीराला अँटिऑक्सिडंटचा पुरवठा होतो आणि तुमच्या हाडांचे आरोग्य वाढते.

केसांसाठीही गाजर फायद्याचे केसांचे पोषण न झाल्यास केस निस्तेज होतात अथवा अकाली गळतात. मात्र, जर घनदाट काळेभोर केस हवे असतील, तर आहारात गाजरचा समावेश करावा. शिवाय, गाजरामधील पोषक घटकांमुळे केस कमकुवत होणे, केसांना फाटे फुटणे, केस कोरडे आणि निस्तेज होणे कमी होते.

दररोज गाजर खाणे आरोग्यासाठी लाभदायक माणसाच्या शरीराचे कार्य सुरळीत सुरु राहण्यासाठी व्हिटॅमिन-ए ची गरज असते. शिवाय गाजरात फायबर्सही भरपूर असतात, ज्यामुळे अपचनाची समस्या होत नाही. यासाठी आहारात गाजराचा रस, कोशिंबिर, सलाद, हलवा जरूर असायला हवा. गाजराचे तुकडे करून ते कच्च्या स्वरूपात खाणे नेहमीच योग्य. गाजराचा रस पिणे शक्य असेल, तर तो प्या, ज्यामुळे गाजरामधील फायबर्स तुमच्या सहज पोटात जातील, असे आहारतज्ज्ञ सांगतात.

सौंदर्यावर गाजराचे फायदे आहारात नियमित गाजराचा समावेश असेल, तर त्वचेच्या समस्या कमी होतात. गाजराचा रस पिण्याने त्वचा हायड्रेट राहते व चेहऱ्यावर एक नैसर्गिक ओलावा आल्यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम होते. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण होते व त्वचेवरील डाग आणि वाण कमी होतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planआहार योजनाchandrapur-acचंद्रपूर