खदानीतील स्फोटाने दगड उडतात शेतात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 23:12 IST2019-02-24T23:11:58+5:302019-02-24T23:12:31+5:30
वेकोलिचा गोवरी खुल्या कोळसा खाणीत कोळसा उत्खननासाठी शक्तीशाली ब्लॉस्टिंग करण्यात येत आहे. त्या शक्तीशाली स्फोटांनी ‘डेंजरझोन’ परिसरापलिकडेही कोळसा खाणीतील दगड थेट शेतात येउन उडत असल्याने येथे काम करणाऱ्या कामगारासंह परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या चार - पाच दिवसांपासून हा प्रकार घडत असल्याने परिसरातील नागरिक चांगलेच हादरले आहे.

खदानीतील स्फोटाने दगड उडतात शेतात !
प्रकाश काळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : वेकोलिचा गोवरी खुल्या कोळसा खाणीत कोळसा उत्खननासाठी शक्तीशाली ब्लॉस्टिंग करण्यात येत आहे. त्या शक्तीशाली स्फोटांनी ‘डेंजरझोन’ परिसरापलिकडेही कोळसा खाणीतील दगड थेट शेतात येउन उडत असल्याने येथे काम करणाऱ्या कामगारासंह परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या चार - पाच दिवसांपासून हा प्रकार घडत असल्याने परिसरातील नागरिक चांगलेच हादरले आहे.
राजुरा तालुक्यातील गोवरी गावालगत वेकोलिची गोवरी खुली कोळस खदान आहे. कोळसा उत्खननासाठी या कोळसा खाणीत शक्तीशाली ब्लॉस्टिंग केली जाते. वेकोलि परिसराला अगदी लागून शेतकºयांची शेती आहे. गोवरी येथील शेतकरी विलास वाघमारे व संजय पिंपळकर यांची शेती कोळसा खाण परिसरात आहे. गेल्या चार - पाच दिवसांपासून खदानीत केलेल्या ब्लास्टिंगचे दगड थेट शेतात उडत आहे. कोळसा खाण शेतापासून दूर असूनही ब्लास्टिंगचे दगड शेतात येत आहे. स्फोटांनी दगड इतके वेगात येतात की दगड पडलेल्या जागेवर खड्डा तयार होतो. कोळसा खाणीत एवढ्या मोठ्या प्रमाणात शक्तीशाली ब्लास्टिंग होत असताना येथील वेकोलिचे जबाबदार अधिकारी अनभिज्ञ कसे? हा धक्कादायक प्रकार वेकोलि अधिकाºयांचा लक्षात का आला नाही, असे प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले आहेत.
विलास वाघमारे, संजय पिंपळकर यांची शेती वेकोलिच्या डेंजरझोन परिसराबाहेर असूनही कोळसा खाणीतील ब्लास्टिंगचे दगड शेतशिवारात येत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे.
याकडे सब एरिया, खाण प्रबंधक वेकोलिच्या जबाबदार अधिकाºयांचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे. वेकोलित एवढ्या मोठ्या प्रमाणात शक्तीशाली ब्लाटिसंग करण्यात येत असल्याने गोवरी येथील अनेक घरांना तडे गेले आहेत. वेकोलि प्रशासनाने कोळसा खाणीतील ब्लास्टिंगची तीव्रता वाढविल्याने कोळसा खाणीतून ब्लास्टिंगचे दगड शेतात उडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे जिविताला धोका निर्माण झाला आहे. यावर वेकोलि प्रशासनाने तत्काळ प्रतिबंध घालावे, अशी मागणी गोवरीवासीयांनी केली आहे.