घरकूल लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:19 IST2021-06-17T04:19:51+5:302021-06-17T04:19:51+5:30
सावरगाव येथे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सन २०२० ते २०२१ या कालावधीत येथील राजेश्वर राघो नेवारे व किसन मंटू ...

घरकूल लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश कार्यक्रम
सावरगाव येथे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सन २०२० ते २०२१ या कालावधीत येथील राजेश्वर राघो नेवारे व किसन मंटू नेवारे या दोन घरकूल लाभार्थ्यांच्या घराचे बांधकाम पूर्ण झाले. त्यांच्या घरकुलांची सदर योजनेत नोंद झाली असल्याने त्यांचा महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ई -गृहप्रवेश कार्यक्रम पार पडला. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना हक्काचे घर मिळावे, त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा तसेच त्यांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे. यासाठी महत्त्वपूर्ण असा निर्णय राज्यात राबविला जात आहे. दरम्यान सावरगाव येथील दोन घरकूल लाभार्थ्यांना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या हस्ते चावी देण्यात आली. याप्रसंगी सरपंच रवींद्र निकुरे, उपसरपंच प्रवीण खोब्रागडे, ग्रामविकास अधिकारी आळे, तथा ग्रामपंचायत सदस्य युवराज रामटेके, शिवशंकर सहारे आदींची उपस्थिती होती.