कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी भ्रष्टाचाऱ्यांच्या रडारवर !

By Admin | Updated: June 21, 2015 01:35 IST2015-06-21T01:35:25+5:302015-06-21T01:35:25+5:30

जिल्ह्यात दारुबंदीची अंमलबजावणी होताच काही भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यांनी डोके बाहेर काढायला सुरुवात केली आहे.

Duty police officer corrupts radar! | कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी भ्रष्टाचाऱ्यांच्या रडारवर !

कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी भ्रष्टाचाऱ्यांच्या रडारवर !

रुपेश कोकावार बाबुपेठ (चंद्रपूर)
जिल्ह्यात दारुबंदीची अंमलबजावणी होताच काही भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यांनी डोके बाहेर काढायला सुरुवात केली आहे. यामुळे दारुतस्करांना अभय मिळत असून कर्तव्यदक्ष पोलिसांचे खच्चीकरण होत आहे. मात्र या भ्रष्टांना कर्तव्यदक्ष पोलिसांकडून धोका वाटू लागल्याने त्यांनी अशा इमानदार पोलिसांचाच बंदोबस्त करायला सुरुवात केली आहे. यातूनच इमानदार पोलिसांच्या खोट्या तक्रारी वरिष्ठांपर्यंत पोहचवून त्यांना रडारवर ठेवण्याचे काम सुरू झाले आहे.
सध्या अवैध दारुविरोधी कारवाया सुरू आहे. यामध्ये आजवर लाखोंचा दारुसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनीही या अवैद्य दारुविक्रीवर प्रत्यक्ष लक्ष घालणे सुरू केले आहे. एकीकडे दारु विक्रेत्यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कर्तव्यदक्ष पोलीस रात्रंदिवस राबतोय. आपल्या बिटमध्ये दारु विकली जाऊ नये, यासाठी २४ तास तो धडपडत असतो. तर दुसरीकडे त्याच खात्यातील काही भ्रष्ट पोलीस कमी वेळात लाखोंची माया जमवण्यासाठी आपल्या खात्याशीच गद्दारी करुन दारु विक्रेत्यांशीच सूत जुळवित आहेत.
काही प्रकरणांमध्ये तर या भ्रष्ट पोलिसांनी दारु विक्रेत्यांचा माल संबधित ठिकाणी पोहचवून देण्याची जबाबदारीच आपल्या खांद्यावर घेतल्याची माहिती आहे. प्रत्येक हद्दीत असा प्रकार सुरू असून काही भ्रष्ट पोलीस कर्मचारीच या साखळीत गुंतलेल्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने आपल्या हद्दीतून माल बाहेर काढून देत आहेत. हा प्रकार मागील काही दिवसापासून सुरु झाला असून यातून अनेकांनी लाखोंची माया गोळा केली आहे. हा प्र्रकार येथेच न थांबता अनेक पोलिसांनाही या चक्रव्यहात अडकविण्याचा या भ्रष्ट साखळीचा कट असल्याची धक्कादायक माहिती आहे.
विशेष म्हणजे, जे पोलीस कर्मचारी अशा आमिषाला बळी न पडता दारुविक्रीविरुद्ध आपली मोहीम राबवित आहेत, अशा कर्तव्यतत्पर पोलिसांचेच दारुविक्रेत्याशी अर्थपूर्ण संबंध असल्याचे चित्र निर्माण करून वरिष्ठांमध्ये संभ्रम पसरविण्याचा प्रकारही अवलंबिला जात आहे. यातून कर्तव्यदक्ष पोलिसांचा बळी घेण्याचा प्रयत्न होत आहे.
खात्यातील अधिकारीही  गुंतल्याची शक्यता
सध्यातरी या प्रकारात मोठे अधिकारी गुंतले असल्याची चर्चा नसली तरी एखाद्या अधिकाऱ्यांशिवाय हे शक्य आहे का, असा प्रश्न आपसुकच उपस्थित होतो. चंद्रपुरात दारूसाठा आणल्यानतंर तो इप्सित स्थळी पोहचविण्याची जबाबदारी संबधित व्यापाऱ्याची असली तरी. आता ही जबाबदारी भ्रष्ट पोलीसच पार पाडत आहेत. त्यांनी घेतलेल्या या मोठ्या जोखीमीला कुण्या एखाद्या अधिकाऱ्याचे पाठबळ असण्याची शक्यता अधिक आहे.
मूलमधील प्रकार यातून घडल्याची चर्चा
काही दिवसांपूर्वी मूल पोलिसांनी एका दारु विक्रत्याला देशी दारुच्या ५० पेट्यासह अटक केली होती. हा दारुसाठा चंद्रपूर येथे पोहचविला जाणार होता. मात्र एका अधीकाऱ्याच्या सतर्कतेने माल मुल येथे पकडण्यात आला. या अधिकाऱ्याच्या वाढत्या कारवाया भ्रष्ट पोलिसांना धोकादायक वाटू लागल्या. त्याचा वचपा काढण्यासाठी संबधित दारुविक्रेत्यांवर दबाव आणून त्याच्याकडून कारवाई टाळण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला पैसे दिल्याचे वदवून घेतले. हे जाणीवपूर्वक केलेले संभाषण रेकार्ड करुन पोलीस अधीक्षकांकडे सादर करण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, ज्या पोलीस अधिकाऱ्याविरूध्द हा कट रचला गेला, त्या अधिकाऱ्याने मूलमध्ये दारुविरोधी सर्वाधिक कारवाया केल्या होत्या. या प्रकरणी संबधित दारु विक्रत्याचे बयाण ब्रम्हपुरी येथील उपविभागीय पोलीस अधीकाऱ्यांसमोर घेण्यात आले. त्यावेळी संबधित दारु विक्रेत्याने आपल्यावर दबाव टाकून चुकीचे बोलायला लावल्याचे बयाणात नमूद केल्याची माहिती आहे.

Web Title: Duty police officer corrupts radar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.