Dussehra of textile traders, Madar on Diwali | कापड व्यावसायिकांची दसरा, दिवाळीवर मदार

कापड व्यावसायिकांची दसरा, दिवाळीवर मदार

ठळक मुद्देकोरोना सेल : ब्रँडेड कंपनीच्या कपड्यांवर विशेष ऑफर 

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनामुळे मागील सात महिन्यांपासून सर्वच बाजारपेठ ठप्प आहे. याचा फटका कापड व्यावसायिकांनाही बसला आहे. दरम्यान,  आता शिथिलता मिळाली असून सध्या सुरु असलेल्या सणासुधीच्या दिवसामुळे व्यावसायिकांच्या चेकऱ्यावर काही प्रमाणात का, होईना हास्य फुलले आहे. आजघडीला ५० टक्क्यांवर व्यवसाय सुरु  आहे. दिवाळीमध्ये आणखी यात वाढ होईल, अशी आशा व्यावसायिकांना आहे.
कोरोनामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा मोठा फटका बाजारपेठेला बसला. लग्नसराई, सणवार असे मोठे सिझन कापड वयावसायिकांच्या हातून गेले. त्यामुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळले. परंतु अशाही परिस्थितीत बहुतांश व्यापाऱ्यांनी खंबीरपणे आपला व्यवसाय सुरुच ठेवला आहे.आता हळूहळू कापड बाजारपेठ सुरळीत होत आहे. दरम्यान, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही कंपन्यांकडून २५ ते ५० टक्के पर्यंत सुट देण्यात येत आहे. यासंदर्भातील अनेक बॅनर शहरात झळकत आहे. 

2500000 सध्याची दररोजची उलाढाल 

 कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐन सिझनच आमच्या  हातून गेला. आता नवरात्रोत्सव, दसरा तसेच दिवाळी असल्याने व्यवसाय होईल, अशी आशा आहे. आता ग्राहकांची काही प्रमाणात गर्दी वाढत आहे. नवीन आणि वेगवेगळ्या फॅशनचे कपडे उपलब्ध आहे.
- रितेश मांडविया, व्यापारी, चंद्रपूर
यावर्षी लग्नसराई, सणवाराच्या उत्सवावर पाणी फेरले आहे. दुकाने पूर्णपणे बंद होती. आता कुठे बाजारात ग्राहकांची गर्दी होऊ लागली. मात्र यातही कोरोनाचे संकट कायम आहे. येत्या  काही दिवसात दिवाळी सण आहे. त्यापूर्वी नवरात्रोत्सव तसेच दसरा आहे. त्यामुळे  बाजारपेठेत गर्दी वाढेल आणि व्यवसाय होईल, अशी आशा आहे.
अमोल गेडाम 
व्यावसायिक, चंद्रपूर

 

 

Web Title: Dussehra of textile traders, Madar on Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.