संचारबंदीच्या काळात साडे तेवीस हजार पॉझिटिव्ह, १५ दिवसांनंतरही रुग्ण कमी होईनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:30 IST2021-05-06T04:30:04+5:302021-05-06T04:30:04+5:30
बॉक्स या कारणामुळे वाढली रुग्णसंख्या जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. संचारबंदी करण्यात आली असूनही अद्यापही अनेक जण विनाकारण ...

संचारबंदीच्या काळात साडे तेवीस हजार पॉझिटिव्ह, १५ दिवसांनंतरही रुग्ण कमी होईनात
बॉक्स
या कारणामुळे वाढली रुग्णसंख्या
जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. संचारबंदी करण्यात आली असूनही अद्यापही अनेक जण विनाकारण घराबाहेर पडत आहेत. बाजारपेठेत गर्दी करीत आहेत.
संचारबंदीच्या काळात चाचण्या वाढविण्यात आल्या. ३१ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत ३८,६९० चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ८ हजार ९९६ बाधित आढळून आले. तर १५ एप्रिल ते १ मे या कालावधीत ६४ हजार ९३४ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये २३ हजार ५२० बाधित आढळून आले.
बॉक्स
बेफिकिरीने वाढले ग्रामीण भागात रुग्ण
चंद्रपूर शहरासह जिल्हाभरातील रुग्णसंख्याही प्रचंड वाढत आहे. ४ मेपर्यंत जिल्ह्यात आढळून आलेल्या ६५ हजार ३८ बाधितांपैकी शहरी भागात २४,४५० रुग्णसंख्या ग्रामीण भागात आढळून आली. अद्यापही ग्रामीण भागातील नागरिक कोरोनाला गांर्भीयाने घेत नाहीत. ते बेफिकिरीने वागत आहेत. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर आदींकडे दुर्लक्ष करतात. अद्यापही ग्रामीण भागात विवाहसोहळे, सामाजिक कार्यक्रम होत आहेत.