कोरोना काळात १०८ च्या रुग्णवाहिकेने दिले ४० हजार रुग्णांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:43 IST2020-12-12T04:43:50+5:302020-12-12T04:43:50+5:30
आठ महिन्यातील स्थिती ; कोरोनासह, विविध रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहचविले परिमल डोहणेचंद्रपूर : कोरोना महामारीत १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने कोरोना, ...

कोरोना काळात १०८ च्या रुग्णवाहिकेने दिले ४० हजार रुग्णांना जीवदान
आठ महिन्यातील स्थिती ; कोरोनासह, विविध रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहचविले
परिमल डोहणेचंद्रपूर : कोरोना महामारीत १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने कोरोना, विविध अपघात यासह दुर्धर आजराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहचवून सुमारे ३९ हजार ९२६ जणांना जीवदान दिले आहे.
ग्रामीण भागात आजही दळणवळाच्या सोई उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना त्वरीत जिल्हा रुग्णालयात किंवा शहरातील रुग्णालयात नेण्यासाठी अडचण जाते. त्यामुळे अनेकांना जीव गमावावा लागत होता. त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळावे, या उद्देशाने शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सन २०१४ पासून सुरु केली. जिल्ह्यात सुर्व सोईसुविधायुक्त २३ रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. रुग्णवाहिकेमध्ये ऑपरेशन हेड दीपककुमार उके यांच्या नेतृत्वात जिल्हा व्यवस्थापक चेतन कोरडे यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सेवा देत आहे. मार्च महिन्यांपासून विविध आजाराचे सुमारे ३९ हजार ९२६ रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहचविण्यात आले. रुग्णवाहिकेत उपलब्ध डॉक्टर प्राथमिक उपचार करीत असल्याने रुग्णालयात जातपर्यंत रुग्ण दगावण्याची शक्यता नाहीसी होत आहे. त्यामुळे १०८ रुग्णवाहिका नवसंजीवनी ठरत आहे
बॉक्स
कोरोनाच्या ३१ हजार रुग्णांना सुखरुप सोडले
कोरोनाबांधित रुग्ण, कोरोनामुक्त अशा सुमारे ३१ हजार ७२६ रुग्णांना मार्च ते नोव्हेंबर या कालावधीत सुखरुप घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला घरुन कोव्हीड केंद्रात सोडणे, कोरोनामुक्त झाल्यानंतर त्याला घरी सोडण्याचे कामे १०८ रुग्णवाहिकेने केले आहे.
बॉक्स
गंभीर कोरोना रुग्णाचे वाचविले प्राण
कोरोनाचा गंभीर रुग्ण नागपूरला हलविण्यासंदर्भात १ नोव्हेंबर रोजी १०८ ला फोन आला. रुग्ण वेंटिलेटर होता. मात्र शल्य चिकीत्सक निवृत्ती राठोड यांनी पीपीई कीट घालण्याचे प्रशिक्षण दिले होते. मात्र रुग्ण गंभीर असल्याने व चंद्रपूर ते नागपूर सुमारे १६० किमीचे अंतर कापणे जीकरीचे होते. मात्र रुग्णवाहिकेतील डॉ.——— वेळीवेळी रुग्णांची तपासणी करुन प्राथमिक उपचार करीत होते. तर चालक अरुण पाटील यांनी रुग्णांना वेळेत नागपूरला पोहचल्याने रुग्ण बरा झाला.
बॉक्स
डॉक्टर, कर्मचाऱ्यांना पुरविणाऱ्या सुविधा
कोरोनाजन्य परिस्थिती असल्याने रुग्णवाहिकेतील डॉक्टर तसेच वाहनचालकांना एन ९५ मास्क, पीपीई कीट, सॅनिटायझर, हॅण्डवॉश आदी सुविधा पुरविण्यात येत आहे.
रुग्णवाहिकेत रुग्णांसाठी ऑक्सिजन यासह अत्यावश्यक सेवा व तज्ज्ञ डॅाक्टर सेवा देत असतात.
कोट
कोरोना तपासणी करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने तपासणी केंद्रावर सोडले. तसेच बाधित रुग्णांना कोव्हिड सेंटरपर्यंत सोडणे तसेच कोरोनामूक्त झालेल्या रुग्णांना घरी सोडण्याचे काम १०८ च्या रुग्णवाहिकेने केले आहे. यासोबतच ईतर प्रकारच्या रुग्णांनाही वेळेवर रुग्णालयात सोडले असून त्यांना जीवदान दिले आहे.
-राजकुमार गहलोह, जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर