महर्षि वाल्मिकी ऋषींच्या जयघोषाने दुमदुमली काजळसर नगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:22 IST2021-02-20T05:22:18+5:302021-02-20T05:22:18+5:30

पळसगाव (पि) : नेरीवरून जवळच असलेल्या काजळसर येथे श्री महर्षी वाल्मिकी ढिवर समाज काजळसर अळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दोन ...

Dumdumali Kajalsar Nagari with the triumph of sage Maharshi Valmiki | महर्षि वाल्मिकी ऋषींच्या जयघोषाने दुमदुमली काजळसर नगरी

महर्षि वाल्मिकी ऋषींच्या जयघोषाने दुमदुमली काजळसर नगरी

पळसगाव (पि) : नेरीवरून जवळच असलेल्या काजळसर येथे श्री महर्षी वाल्मिकी ढिवर समाज काजळसर अळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय श्री महर्षी वाल्मिकी ऋषी घटस्थापना दिन प्रांगणात साजरा करण्यात आला.

१७ फेब्रुवारीला सकाळी ग्रामसफाई करून सकाळी ८ वाजता मुखरू मारबते महाराज यांच्या हस्ते घटस्थापना करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. दुपारी महिलांच्या हळदी कुंकुवाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला गावातील अनेक महिलांनी भाग घेतला त्यानंतर २ वाजता महिलांसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली सायंकाळी भजन संध्याचे आयोजन करण्यात आले होते. यात संगीत महिला भजन मंडळ नांदगाव, श्री वाल्मिकी गुरुदेव मुलीचे भजन मंडळ किन्ही मुरमाडी गुरुदेव भजन मंडळ, बोथली महिला वारकरी भजन मंडळ, टेकेपार जय वाल्मिकी भजन मंडळ, खंडाळा वारकरी भजन मंडळ, अडेगाव टेकरी काजळसर, बेलदेव भजन मंडळ नवतला यांनी भाग घेतला होता. तसेच महर्षी वाल्मिकी ऋषीची कुटी तयार केेली होती. त्यानंतर गावातील भजन मंडळाच्या सहकार्याने वाल्मिकी ऋषींच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली. या मिरवणुकीत गावातील सर्व नागरिकांनी भाग घेतला होता. महिलांनी रंगीत साडीचोळी घालून आकर्षक वेषभूषा साकारली होती.यावेळी मंगला गिरीधर हटवादे , डॉ प्रकाश नान्हे उपस्थित होते.

Web Title: Dumdumali Kajalsar Nagari with the triumph of sage Maharshi Valmiki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.