अऱ्हेरनवरगाव मार्गावर पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा
By Admin | Updated: September 19, 2016 00:54 IST2016-09-19T00:54:06+5:302016-09-19T00:54:06+5:30
तालुक्यापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेला अऱ्हेरनवरगाव- पिंपळगाव (भो.) हा मार्ग नेहमी पाण्याखाली असतो.

अऱ्हेरनवरगाव मार्गावर पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा
गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा : रस्ता दुरुस्तीची मागणी
ब्रह्मपुरी : तालुक्यापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेला अऱ्हेरनवरगाव- पिंपळगाव (भो.) हा मार्ग नेहमी पाण्याखाली असतो. त्यामुळे या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरुन मार्गक्रमण करणाऱ्यास प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
दोन विधानसभा क्षेत्रात विभागलेला अऱ्हेरनवरगाव ब्रह्मपुरी तालुक्यातील महत्वपूर्ण ठिकाण आहे. या गावातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना शिक्षण, खरेदी, शासकीय कामे, भाजीपाला विक्रीसाठी अऱ्हेरनवरगाव या मार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे सायकल, दुचाकी व चारचाकी वाहने या मार्गावरुन जात असतात. परंतु, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर ेखड्डे पडलेले आहेत. परिणामी मार्गावर नेहमी पाणी साचले असते. यामुळे हा मार्ग जलमार्ग असल्याचे चित्र नेहमीच दिसून येते. या जलमार्गातून मुक्ती केव्हा मिळणार, असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे.
सदर रस्त्यावरील ८०० मीटर लांबीच्या रस्त्याचे सिमेंटीकरण झालेले आहे.मात्र उर्वरित रस्त्याची दैनावस्था झाली आहे. रत्यावर लहान मोठ्या अशे अनेक खड्डे पडले आहेत. त्यामुळे या खड्डयात नेहमी पाणी साचले असते. परिणामी या मार्गावर अनेकांचे अपघात घडले आहेत.
त्यामुळे या रस्त्याचेसुद्धा सिमेंटीकरण होणे करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.यासंबधी जनप्रतीनिधीनासुद्धा कल्पना देण्यात आली. मात्र तेसुद्धा दुर्लक्ष करीत आहेत.
जर रस्त्याची दुरुस्ती अथवा सिमेंटीकरण झाले नाही, तर गावकऱ्याकडून आंदोलन करण्याचा इशारा प्रसिद्धी पत्रकातून अऱ्हेरनवरगाववासीयांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी )