बसगाडीच्या अनियमिततेमुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर
By Admin | Updated: December 24, 2015 01:20 IST2015-12-24T01:20:02+5:302015-12-24T01:20:02+5:30
येथील प्रियदर्शिनी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये नायगाव परिसराच्या विद्यार्थिनी शिक्षणाकरीता बसने दररोज ये-जा करतात.

बसगाडीच्या अनियमिततेमुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर
प्रशासनाचे दुर्लक्ष : रात्री उशिरापर्यंत करावी लागते प्रतीक्षा
घुग्घुस : येथील प्रियदर्शिनी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये नायगाव परिसराच्या विद्यार्थिनी शिक्षणाकरीता बसने दररोज ये-जा करतात. मागील अनेक दिवसांपासून या गावातील विद्यार्थिंनी वणी-घुग्घुस-चंद्रपूर या बसने येणे व चंद्रपूर-घुग्घुस- वणी बसने ये-जा करतात. मात्र वेळेवर बस येत नसल्यने तासन्तास विद्यार्थ्यांना घुग्घुस बस स्थानकावर प्रतीक्षा करावी लागते. विशेषता रात्री उशीरापर्यंत घरी जावे लागत असल्याने त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
घुग्घुस येथील प्रियदर्शनी कन्या विद्यालयात घुग्घुस नजीक वणी तालुक्यातील नायगाव ग्रामीण क्षेत्रातून अनेक मुली या विद्यालयात शिक्षणाकरीता दररोज ये-जा करीत असतात. चंद्रपूर आगारातून सायंकाळी ५ वाजताची वणी एस.टी. बस सुरू आहे. त्या बसने नायगावच्या मुली गावाला परत जात असतात. मात्र या बसच्या अनियमिततेमुळे विद्यार्थिनींना सायंकाळी उशीरा रात्रीपर्यंत घुग्घुस बस स्थानकावर बसची प्रतिक्षा करावी लागते. दिवसभर शाळा करुन ५ वाजता बसस्थानकावर येवून रात्री सात साडेसात पर्यंत बस येत नसल्यामुळे वेळे वाया जातो. नंतर अभ्यासाला वेळ मिळत नाही. हा प्रकार गेल्या वर्षीपासून सुरू आहे. याबाबतच आगार प्रमुख तथा घुग्घुस क्षेत्राचे आमदार, खासदार व वर्तमान पालमंंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अनेकदा पत्र देवून नियमित बस सोडण्याची विनंती केली. मात्र याकडे दुर्लक्षच झाल्याने नागरिकांत असंतोष पसरला आहे. (वार्ताहर)