स्टेअरिंग निकामी झाल्याने प्रवासी बस उलटली

By Admin | Updated: March 2, 2015 01:06 IST2015-03-02T01:06:54+5:302015-03-02T01:06:54+5:30

भद्रावती मार्गे माजरी -वणी जाणाऱ्या बसगाडीचे स्टेअरींग निकामी झाल्याने बस रस्त्यालगत उलटली. ही घटना रविवारी सायंकाळी ६ वाजता कोंढा-माजरी मार्गावरील कडोली घडली.

Due to sterilization failure, the bus passenger bus fell | स्टेअरिंग निकामी झाल्याने प्रवासी बस उलटली

स्टेअरिंग निकामी झाल्याने प्रवासी बस उलटली

भद्रावती : भद्रावती मार्गे माजरी -वणी जाणाऱ्या बसगाडीचे स्टेअरींग निकामी झाल्याने बस रस्त्यालगत उलटली. ही घटना रविवारी सायंकाळी ६ वाजता कोंढा-माजरी मार्गावरील कडोली घडली. या अपघातात एक प्रवासी गंभीर जखमी तर आठ जण किरकोळ जखमी झाले.
एम.एच-४०/८६२९ ही वणी आगाराची बस भद्रावतीवरुन माजरी-वणी मार्गाने जात असताना कडोली गावाजवळ अचानक बसचे स्टेअरींग निकामी झाले. त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात आनंदराव देवतळे (८०) रा. कोढा हे गंभीर जखमी झाले. तर योगिता पिजारकर (१५) रा. वळगाव, राजश्री येरेकर (१९) रा. नांदगाव (पुणे), सुखदेव विठोबा येरेकर (६५) नांदेपेरा, पुष्पा भटवलकर (४८) कोसारा, ममता खोब्रागडे (३२) माजरी कालरी, मीराबाई खोब्रागडे (६०) माजरी कॉलरी, बेबी येरेकर नांदेपेरा हे आठ जण किरकोळ जखमी झाले. जखमींना भद्रावतीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चालक अंकुश आत्राम व वाहक संजीवन पांडे यांची चौकशी सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Due to sterilization failure, the bus passenger bus fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.