शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

रेती वाहतुकीमुळे रस्त्याचे वाजले तीन-तेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:12 PM

तालुक्यातील अऱ्हेर-नवरगाव येथील वैनगंगा नदीपात्रातील रेती घाटातून सुमारे तीनशे हायवा ट्रक व ७० ट्रॅक्टरने रेतीची दिवस-रात्र उचल सुरू आहे. हे ट्रक व ट्रॅक्टर रेती भरून गावातून शिवारात जाणाऱ्या तसेच अऱ्हेर-नवरगाव-कुर्झा रस्त्यावरून जात असल्यामुळे या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.

ठळक मुद्देजीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास : अपघाताचे प्रमाणही वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : तालुक्यातील अऱ्हेर-नवरगाव येथील वैनगंगा नदीपात्रातील रेती घाटातून सुमारे तीनशे हायवा ट्रक व ७० ट्रॅक्टरने रेतीची दिवस-रात्र उचल सुरू आहे. हे ट्रक व ट्रॅक्टर रेती भरून गावातून शिवारात जाणाऱ्या तसेच अऱ्हेर-नवरगाव-कुर्झा रस्त्यावरून जात असल्यामुळे या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.या रस्त्यांवरून साधे पायी चालणेसुद्धा दुरापास्त झाले आहे. तसेच सायकल चालविणेसुद्धा कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे आतापर्यंत गावकऱ्यांनी दोन-तीनदा रेतीची वाहतूक करणाºया वाहनाना अडवून आधी रस्ता दुरुस्त करा आणि नंतरच रेतीची वाहतूक करा, अशी भूमिका घेतली होती. परंतु रितसर कायदेशीर मार्गाने गावकऱ्यांनी मागणी न केल्यामुळे कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना करण्यात आली नाही.सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून रस्त्याची ऐसीतैशी झाली आहे. अऱ्हेर नवरगाव, ही गावे वैनगंगा नदी किनाऱ्यावर वसलेले आहे. या गावांची लोकसंख्या दहा हजारहून अधिक आहे. अऱ्हेर नवरगाव येथील वैनगंगा नदीपत्राच्या रेतीघाटावरून तीनशे ट्रक व ७० ट्रॅक्टरने दिवसरात्र मोठया प्रमाणात रेतीचा उपसा सुरू असल्याने अºर्हर नवरगाव रेतीघाट ते ब्रम्हपुरी या मार्गाचे तीन तेरा वाजले आहेत.गावालगच्या मुख्य रस्त्यावर पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग असलेली विकास विद्यालय शाळा आहे. या शाळेत आजूबाजूच्या गावातील विध्यार्थी मोठ्या संख्येने येत असतात. परंतु येथील रोडच्या गंभीर अवस्थेने व रेतीघाटातील रेती वाहतुकीने बºयाच दुर्घटना झालेल्या असूनसुद्धा विध्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेचा प्रवास करावा लागतो. या परिसरातील नागरिक पूर्णत: शेती या व्यवसायावर अवलंबून असून येथे मोठया प्रमाणावर भाजीपाला पिकविला जातो. आणि तो भाजीपाला विकण्यासाठी व पोटाची खडगी भरण्यासाठी ब्रह्मपुरीच्या बाजारपेठेत न्यावे लागते. तसेच ब्रम्हपुरी हे शिक्षणाचे माहेरघर असून परिसरातील शेकडो विद्यार्थी शिक्षणाकरिता ब्रह्मपुरीला ये-जा करत असतात. परंतु प्रवासादरम्यान त्यांना अडचणींचा सामना लागत आहे.पुलांचीही दुरवस्थाब्रम्हपुरी ते अऱ्हेर नवरगाव या मार्गावर असलेल्या नाल्यांवरील दोन पूल अतिशय दयनीय अवस्थेत असून भविष्यात मोठी दुर्घटना होण्याचे नाकारता येत नाही. अशा स्थितीत त्यावरून वाहतूक करणे हे जीवघेणे झालेले असल्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने सदर पुलाची आणि रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.