पावसामुळे कोरपना तालुक्यातील रस्ते उखडले

By Admin | Updated: July 5, 2017 01:08 IST2017-07-05T01:08:47+5:302017-07-05T01:08:47+5:30

विदर्भाच्या टोकावर आणि अत्यंत मागासलेला तालुका म्हणून कोरपना तालुक्याला ओळखले जाते.

Due to the rains, roads in Korapana taluka have been crushed | पावसामुळे कोरपना तालुक्यातील रस्ते उखडले

पावसामुळे कोरपना तालुक्यातील रस्ते उखडले

दुरुस्ती करण्याची मागणी : वाहनचालकांची कसरत
लोकमत न्यूज नेटवर्क
आवारपूर : विदर्भाच्या टोकावर आणि अत्यंत मागासलेला तालुका म्हणून कोरपना तालुक्याला ओळखले जाते. तालुक्यातील अनेक रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरुन मार्गक्रमण करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
तालुक्यातील वनोजा-कळमना, विरुर आवारपूर, कवटाळा ते भोयेगाव हे मार्ग पहिल्या पावसानेच पूर्णपणे उखडले आहेत. वनोजा आणि कळमना हा मार्ग सतत चालू असतो. लोकांना वणी, कोरपना, वनसडी या बाजारपेठ पडतात. परंतु, या बाजारपेठेत जाण्यासाठी नागरिकांना वनोजा कळमाना या मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र हा मार्ग पूर्णपणे उखडलेला असल्याने आपला जीव मूठीत घेऊन प्रवास करावा लागतो. थोडासा जरी पाणी आली तर रस्तावरील सर्व खड्ड्यात पाणी साचते. त्यामुळे वाहन चालवताना वाहनचालकाला कसरत करावी लागते.
तसेच विरूर ते आवाळपूर मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच या मार्गावरील डांबरीकरण पूर्णपणे उखळले आहे. पूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण केले असल्यामुळे अनेकजण या मार्गाचा वापर करायचे. मात्र प्रशासनाकडून रस्ते उखडल्यानंतर डागडूजी करण्यात आली नाही. त्यामुळे सदर मार्ग पूर्णपणे उखडला आहे. तसेच कवटाळा भोयेगाव या मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे पाणी आली ते साचून राहते त्यामुळे मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. या मार्गावरुन गडचांदूर, लखमापूर, तळोधी, कवठाळा, धूनकी, भोयगाव, कोरपना, वनसडी, नारंडा, अंतरगाव, कढोली, वनोज, कोडसी, नांदगाव, धानोरा, उपरवाही परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात येजा करतात. रसत्याच्या दुरवस्थेमुळे मागील वर्षी भोयगाव येथील शालेय विद्यार्थ्यांचा ओव्हरलोड कॅप्सूलमध्ये नाहक बळी गेला. तरीसुद्धा रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी रोष व्यक्त होत आहे.

Web Title: Due to the rains, roads in Korapana taluka have been crushed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.