अनकेश्वर मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : घरची परिस्थिती बेताची. आई वडिल दोघे पदवीधर. दोघांना प्रविणा व अनुजा नावाच्या दोन मुली. वडील आॅटोचालक व आई मोलमजुरी करून कुटुंबाचा डोलारा सांभळते. परिस्थितीवर मात करून आॅटोचालकाच्या मुलीने दहावीच्या परीक्षेत निकालात उत्तुंग भरारी घेतली. बल्लारपूर तालुक्यात विसापूर येथील अनुजा परमेश्वर उमरे हिने दहावीत ९० टक्के गुण मिळवून आपल्या हुशारीची चुणूक दाखविली.विशेष म्हणजे, तिची मोठी बहीण प्रविणा उमरे हिनेदेखील ९४.८० टक्के गुण प्राप्त करून तालुक्यात प्रथम स्थान पटकाविले होते.बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील परमेश्वर उमरे व विश्राांती उमरे या दाम्पत्याला प्रविणा व अनुजा दोन मुली. मुलीची कुशाग्र बुध्दीमतेला प्रयत्नाचे बल देण्यास कोणतीच कमतरता ठेवली नाही. आयुष्यातील कठीण प्रसंगांना धैर्याने तोंड देत, त्यांनी बल्लारपूर येथील आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मुलींना शिकविले. स्वयंअध्ययनाने प्रविणाने दहावीत यशोशिखर गाठले होते. तिच्या पावलावर पाऊल ठेवत अनुजानेदेखील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाला गवसणी घातली. मात्र भाषा विषयात काहीसे कमी गुण मिळाल्याने मोठे यश हुकल्याची खंत तिच्या मनात आहे. अनुजाचे वडील आॅटोचालक आहे. आई मोलमजुरी करते. मात्र या दोघांनी मुलांच्या शिक्षणात कधीच कमी पडू दिली नाही. शिकवणी वर्ग लावण्याइतपत आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे अशाही खडतर आयुष्यात स्वयंअध्ययन व अभ्यासात तिने वेळेचे नियोजन केले. प्रबळ इच्छाशक्तीला प्रयत्नांची जोड दिली. त्यामुळेच तिला हे यश संपादन करता आले. परमेश्वर व विश्रांती उमरे या दाम्पत्याची मुलींच्या शिक्षणासाठीची धडपड समाजाला प्रेरणादायी ठरणारी आहे. बल्लारपूर येथील आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलमधील शिक्षकवृंदानीही तिला उपयुक्त मार्गदर्शन केले.
प्रतिकुलतेवर मात करून अनुजाची भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 00:52 IST
घरची परिस्थिती बेताची. आई वडिल दोघे पदवीधर. दोघांना प्रविणा व अनुजा नावाच्या दोन मुली. वडील आॅटोचालक व आई मोलमजुरी करून कुटुंबाचा डोलारा सांभळते. परिस्थितीवर मात करून आॅटोचालकाच्या मुलीने दहावीच्या परीक्षेत निकालात उत्तुंग भरारी घेतली.
प्रतिकुलतेवर मात करून अनुजाची भरारी
ठळक मुद्देवडील आॅटोचालक । विसापूर येथील अनुजा उमरेची यशोगाथा