ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे ‘त्या’ शाळकरी मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 22:23 IST2018-08-07T22:22:37+5:302018-08-07T22:23:00+5:30
येथील गोरक्षण वॉर्डातील पियुष रविंद्र तायडे (१३) या शाळकरी मुलाचा रविवारी ट्रक अपघातात मृत्यू झाला. ट्रकचालकाचा निष्काळजीपणामुळे पियुषचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी ट्रकचालक समरसिंग बाळूसिंंग मरकाम याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे ‘त्या’ शाळकरी मुलाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : येथील गोरक्षण वॉर्डातील पियुष रविंद्र तायडे (१३) या शाळकरी मुलाचा रविवारी ट्रक अपघातात मृत्यू झाला. ट्रकचालकाचा निष्काळजीपणामुळे पियुषचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी ट्रकचालक समरसिंग बाळूसिंंग मरकाम याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी दुपारी चार वाजता रविंद्र तायडे आपल्या मुलासह दुचाकी क्रमांक एम. एच ३४ डी ३४९२ ने घराकडून बामणीच्या दिशेने जात होते. दरम्यान त्यांचा मोठा मुलगा भूषणही दुचाकी क्र. एम एच ३४ टी ६६५४ घेवून त्यांच्या मागे निघाला. यावेळी दोनही दुचाकी गुरुनानक महाविद्यालयाजवळ गेल्यानंतर वळण घेण्याकरिता वळताना गाडीचा इंडिकेटर दाखविला तसेच हातही दाखविला. यावेळी मागून येणाऱ्या ट्रक चालकाने रविंद्र तायडेच्या दुचाकीला धडक दिली. तसेच भुषणच्या गाडीलाही धडक दिली. यामध्ये पियुषच्या डोक्याला जबर मार बसल्याने तो जागीच ठार झाला. तर रविंद्रच्या व भुषणलाही मार लागला. ट्रकचालक ट्रक सोडून फरार झाल्यानंतर काही वेळातच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ट्रकचालकाने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. भुषणच्या तक्रारीवरून चालक समरसिंह यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.