लाॅकडाऊनमुळे रोजी गेली, रोटी देणार शिवभोजन थाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:27 IST2021-04-15T04:27:18+5:302021-04-15T04:27:18+5:30
चंद्रपूर : कोरोना संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. अशा वेळी संसर्ग रोखण्यासाठी ...

लाॅकडाऊनमुळे रोजी गेली, रोटी देणार शिवभोजन थाळी
चंद्रपूर : कोरोना संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. अशा वेळी संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक संचारबंदी लागू केली आहे. मागील वर्षी लाॅकडाऊन केल्यानंतर नागरिकांचे बेहाल झाले होते. अनेकांवर उपाशी राहण्याची वेळ आली होती. मात्र, शिवभोजन थाळीमुळे आधार मिळाला. आता यावेळीही लाभार्थ्यांना मोफत शिवभोजन देण्यात येणार आहे. त्यामुळे रोजी गेली, तरीही रोटी मिळणार आहे.
कोरोना रुग्ण दरदिवशी वाढत आहे. ही साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. या अंतर्गत विविध अटी लावल्या आहे. अशावेळी अनेकांचा रोजगार जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे तर बेहाल होणार आहे. त्यामुळे त्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने शिवभोजन योजनेंतर्गत केंद्रातून आता मोफत थाळी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रोजगार गेला, तरीही पुढील एक महिना गरजूंना शिवभोजनचा आधार मिळणार आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत २३ शिवभोजन केंद्रातून २ हजार ५०० थाळींचे वितरण केल्या जाणार आहे. यामध्ये चंद्रपूर शहरातून सहा केंद्रातून तर उर्वरित केंद्र तालुकास्तरावर आहे. या माध्यमातून गरजूंना पोट भरणे शक्य होणार आहे.
बाॅक्स
जिल्ह्यातील शिवभोजन थाळी
२३
दररोज किती जण घेतात लाभ
२५००
१.राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवेशिवाय कुठेच काही सुरू राहणार नाही. त्यामुळे गरिबांना जगण्यासाठी आता शिवभोजनच आधार ठरणार आहे. पूर्वी १० रुपयांना मिळणारी थाळी कोरोना संकटामुळे ५ रुपयांत दिली जात होती. आता तर सर्वांसाठी मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
२.जिल्ह्यात २३ केंद्राच्या माध्यमातून २ हजार ५०० शिवभोजन थाळीचे वितरण केल्या जाते. यामध्ये चंद्रपूरात सहा केंद्र आहे. या माध्यमातून शिवभोजन थाळीचे गरजूंना वितरण करण्यात येणार आहे.
कोट
थाळीचा लाभ घेणारे
कोट
राज्य सरकारने मागील वर्षभरापासून शिवभोजन थाळी सुरू केली आहे. यामुळे गरजूंना खूप मोठी मदत झाली आहे. पाच रुपयांमध्ये जेवण मिळत होते. आता कोरोना संकटामुळे लाॅकडाऊन केल्या जाणार आहे. त्यामुळे गरिबांचा विचार करून शासनाने मोफत थाळी देण्याचे जाहीर केल्यामुळे अडचणीच्या काळात मदत होईल.
-मोहन केळझरकर, चंद्रपूर
कोट
कोरोना संकटामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. मागील वर्षी अनेकांची मोठी फजिती झाली होती. या वर्षी तिच अवस्था आहे. शासनाने गरिबांचा विचार करून शिवभोजन पाच रुपयांत देण्यास सुरुवात केली होती. आता तर मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे गरजूंना लाभ होईल. मात्र, लाभ देतानाही अति आवश्यक असलेल्यांनाच देणे गरजेचे आहे.
- राकेश यादव