अहंकारामुळे वाढलेत घटस्फोटाचे प्रमाण- मैंदळकर

By Admin | Updated: September 8, 2016 00:57 IST2016-09-08T00:57:21+5:302016-09-08T00:57:21+5:30

कौटुंबिक कलह नाही, असे एकही घर शोधून सापडणार नाही. पती-पत्नी दोघांनीही सहनशिलता वेशीवर टांगली आहे

Due to the increase of ego, divorce rate - Mandalkar | अहंकारामुळे वाढलेत घटस्फोटाचे प्रमाण- मैंदळकर

अहंकारामुळे वाढलेत घटस्फोटाचे प्रमाण- मैंदळकर

चंद्रपूर : कौटुंबिक कलह नाही, असे एकही घर शोधून सापडणार नाही. पती-पत्नी दोघांनीही सहनशिलता वेशीवर टांगली आहे आणि त्यांच्यात अहंकार रुपी राक्षसाने वास केलेला आहे. त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वर्षागणिक वाढत आहे. या मागे मानसिक कारणे महत्त्वाची असून अहंकारामुळे ८९ टक्के घटस्फोट होत असल्याचे डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांनी म्हटले आहे. 
इतर मानसिक कारणे आणि घटस्फोट प्रमाण स्वार्थीपणा ४५.५ टक्के, लैगिंक छळ ४१.७ टक्के, व्यक्तित्व विकृती ३७.९ टक्के संपत्तीचा हव्यास ४२ टक्के, व्यसन ३५.६ टक्के, भिती ३३.३ टक्के असून वाढत्या घटस्फोटामध्ये सर्वाधिक प्रमाण मानसिक कारणाचे आहे. विविध मानसीक कारणामुळे घटस्फोट होत असून याला प्रेमविवाह व लिव्ह इन रिलेशनशिफ अफवाद नाही. प्रेमविवाह व लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये पती-पत्नी दोघांचा स्वभाव, आवड-निवड, मानसिकता आदीबाबत परिचित असतात. तरीही त्यांच्यामध्येही घटस्फोट होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कुणाच्या घरी केव्हा घटस्फोटाचा ‘स्फोट’ होईल हे सांगता येत नाही. अहंकार सोडा दांम्पत्यानो आणि सांभाळा आपली घरं, खोट्या हुंडाबळीच्या केसेस करून सासर आणि माहेर या दोन्ही कुटुंबाला कलंक लावू नका, असे डॉ. मैंदळकर यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Due to the increase of ego, divorce rate - Mandalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.