महोत्सवामुळे ब्रह्मनगरी झाली लोकनगरी
By Admin | Updated: January 3, 2016 01:27 IST2016-01-03T01:27:27+5:302016-01-03T01:27:27+5:30
एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन आखीव आणि मनापासून केले तर ते किती यशस्वी होते आणि लोकही त्यास कसे भरभरून प्रतिसाद देतात, याची प्रचिती आज ब्रह्मपुरी येथे आली.

महोत्सवामुळे ब्रह्मनगरी झाली लोकनगरी
घनश्याम नवघडे ल्ल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगरी (ब्रह्मपुरी)
एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन आखीव आणि मनापासून केले तर ते किती यशस्वी होते आणि लोकही त्यास कसे भरभरून प्रतिसाद देतात, याची प्रचिती आज ब्रह्मपुरी येथे आली. अवघी ब्रह्मपुरीनगरी लोकनगरी झाल्याचे शनिवारी दिसून आले.
ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी येथे ब्रह्मपुरी महोत्सवाचे आयोजन करण्याचा संकल्प सोडला आणि वडेट्टीवारांची अवघी चमू कामाला लागली. ब्रह्मपुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरील भव्य प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्याचे निश्चित झाल्यानंतर महोत्सवाच्या आयोजनासाठी जे जे व्यासपीठ आवश्यक आहेत. त्या त्या व्यासपिठांची भव्य प्रमाणावर निर्मिती करण्यात आली.
शनिवारी भव्य रॅलीने या महोत्सवाची खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. ढोल-ताशे तसेच विविध देखावे या रॅलीत समाविष्ट होते. शहरातील प्रमुख मार्गाने ही रॅली फिरविण्यात आली. विविध घोषणा देशभक्तीपर गीत यांनी अवघ्या ब्रह्मपुरीचे वातावरण भारून गेले होते. या रॅलीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा नर्दी केली होती. संध्याकाळी या रॅलीचे समारंभस्थळी विसर्जन झाल्यानंतर कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी हजारोच्या संख्येने झालेली गर्दी हे आयोजनाच्या यशस्वीतेवर झालेले शिक्कामोर्तब होते. या गर्दीने अवघी ब्रह्मनगरी लोकनगरी झाल्याचे भासत होते. तशीही ब्रह्मपुरी सांस्कृतीक दृष्ट्या अतिशय पुढारलेले शहर आहे.