रखरखत्या उन्हात प्रवाशांचा एसटी बसला दे धक्का !

By Admin | Updated: June 1, 2015 01:22 IST2015-06-01T01:20:44+5:302015-06-01T01:22:30+5:30

सूर्य आग ओकत असताना जनतेच्या जिव्हाळ्याची मानली जाणारी एसटी बसही यापासून सुटलेली नाही.

Due to the drying hours, the passengers of the bus will not let the bus stop! | रखरखत्या उन्हात प्रवाशांचा एसटी बसला दे धक्का !

रखरखत्या उन्हात प्रवाशांचा एसटी बसला दे धक्का !

वरोरा : सूर्य आग ओकत असताना जनतेच्या जिव्हाळ्याची मानली जाणारी एसटी बसही यापासून सुटलेली नाही. बसने बहुसंख्य नागरिक प्रवास करीत असताना रखरखत्या उन्हात एसटी बस रस्त्यावर अचानक बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना वाहक व चालकांनी खाली उतरून एसटीला धक्का मारण्याची विनंती केली. प्रवास करायचा आहे तर धक्का मारावाच लागेच असे म्हणत शरीराची लाही करीत अखेर प्रवाशांच्या महत्प्रयासाने बस सुरू झाली अन् पुढच्या प्रवाशाला निघाली.
राजुरा आगाराची एमएच ०७ सी ९५३८ या क्रमांकाची एसटी बस राजुरा येथून यवतमाळकडे रविवारी सकाळी निघाली. एसटी बस प्रवाशाने खचाखच भरली होती. सकाळी ११ वाजताच्या सुमारास सदर एसटी बस वरोरा येथील रत्नमाला चौकात उभी राहून वरोरा येथील प्रवाशांना उतरवत असताना प्रवाशांची चढ-उतार झाल्यानंतर महिला वाहकाने एसटी बस सुरू करण्याकरिता द्वार बंद केला. बस पुढे नेण्याची सूचना चालकास दिली. चालकाने बस सुरू करण्याचा प्रयत्न केला. परंतु चालकाला एसटी बस सुरू होईना.
उष्ण तापमानामुळे एसटी बसमधील प्रवासी कंटाळले तेवढ्यात एसटी महिला वाहक व चालकाने एसटी प्रवाशांना बसला धक्का मारण्याची विनंती केली. प्रवासी तातडीने खाली उतरले व एसटी बसला मागून व पुढून धक्का मारण्यास भर उन्हात सुरुवात केली.
धक्का मारणारे प्रवाशी घामाने ओलेचिंब झाले. अखेर महत्प्रयासाने एसटी बस प्रवाशांच्या धक्क्याने सुरू झाली आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. एसटी बसने शेकडो प्रवासी प्रवास करतात. मात्र तापमानामुळे बसला प्रवासात धक्का मारण्याची शिक्षा भर उन्हात मिळाली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Due to the drying hours, the passengers of the bus will not let the bus stop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.