सततच्या पावसामुळे चनाखा येथे मोठी विहीर खचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:29 IST2021-07-30T04:29:21+5:302021-07-30T04:29:21+5:30
सास्ती : राजुरा तालुक्यातील चनाखा येथील शेतकरी रमेश मडावी यांच्या शेतातील मोठी विहीर सततच्या पावसामुळे खचून त्यावरील इंजिन सुद्धा ...

सततच्या पावसामुळे चनाखा येथे मोठी विहीर खचली
सास्ती : राजुरा तालुक्यातील चनाखा येथील शेतकरी रमेश मडावी यांच्या शेतातील मोठी विहीर सततच्या पावसामुळे खचून त्यावरील इंजिन सुद्धा विहिरीत पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.
चनाखा येथील शेतकरी रमेश मडावी यांनी त्यांच्या सहा एकर शेतीच्या सिंचनाकरिता पैसा खर्च करून शेतात मोठी विहीर बांधली होती. या विहिरीच्या भरोशावर सिंचन करून भाजीपाला व इतर शेती उत्पन्नात त्यांनी वाढ सुद्धा केली ; परंतु राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या सततच्या पावसाने ही विहीर खचली असून तिचे संपूर्ण दगडी बांधकाम विहिरीत कोसळले आणि त्या विहिरीवर सिंचनासाठी ठेवलेले इंजिन सुद्धा या भरावात दबले गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. भविष्यात शेतीसाठी सिंचनाचा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. विहीर खचल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पावसाने खचलेल्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.