सामूहिक बुद्धवंदनेने जनसमूह धम्ममय

By Admin | Updated: October 16, 2014 23:23 IST2014-10-16T23:23:06+5:302014-10-16T23:23:06+5:30

अनुप्रवर्तन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात सामुहिक बुद्धवंदनेने झाली. त्यानंतर हेमंत शेंडे व त्यांच्या चमुच्या स्फुर्तीगीतांनी दीक्षाभूमीवरील जनसमुह धम्ममय झाला.

Due to collective Buddhavandane mass group Dhammai | सामूहिक बुद्धवंदनेने जनसमूह धम्ममय

सामूहिक बुद्धवंदनेने जनसमूह धम्ममय

चंद्रपूर : अनुप्रवर्तन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात सामुहिक बुद्धवंदनेने झाली. त्यानंतर हेमंत शेंडे व त्यांच्या चमुच्या स्फुर्तीगीतांनी दीक्षाभूमीवरील जनसमुह धम्ममय झाला.
समारंभाचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जून शुरेई ससाई यांनी दीक्षाभूमीवर उपस्थित बौद्ध बांधवांना धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अरुण घोटेकर, भदन्त नागघोष थेरो, भदन्त नागवंशा कनान, भदन्त नागाप्रकाश, भदन्त नागादिप, भदन्त धम्मबोधी, भदन्त नागवंशा, नागपूर तसेच संस्था उपाध्यक्ष अशोकराव घोटेकर, मारोतराव खोब्रागडे, सचिव वामनराव मोडक, सदस्य राकेश गेडाम, सी. के. मेश्राम, प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. (स्थानिका प्रतिनिधी)

Web Title: Due to collective Buddhavandane mass group Dhammai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.