मद्यपींचा पुन्हा गळा कोरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:20 IST2021-07-21T04:20:03+5:302021-07-21T04:20:03+5:30
चंद्रपूर : बहुप्रतीक्षेनंतर ६ जूनपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारू सुरू झाली. यामुळे मद्यपींनी अक्षरश: दारूच्या बाॅटल्स डोक्यावर घेत आनंद व्यक्त ...

मद्यपींचा पुन्हा गळा कोरडा
चंद्रपूर : बहुप्रतीक्षेनंतर ६ जूनपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारू सुरू झाली. यामुळे मद्यपींनी अक्षरश: दारूच्या बाॅटल्स डोक्यावर घेत आनंद व्यक्त केला होता. दरम्यान, शनिवार आणि रविवारी दारू विक्री बंद असते. असे असतानाच जिल्ह्यात दारू सुरू झाल्यानंतर प्रथमच मंगळवारी दारू दुकाने बंद दिसताच मद्यपींना मोठा शाॅक बसला. अनेकांनी शहरातील बाॅरसमोर जाऊन चाचपणी सुरू केली. मात्र त्यानंतर आषाढी एकादशीनिमित्त दारू दुकाने बंद असल्याचे समजताच, त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडल्याचे चित्र मंगळवारी सकाळी बघायला मिळाले.
जिल्ह्यात दारूबंदीनंतर दारूसमर्थक तसेच विरोधक असे चित्र निर्माण झाले होते. दरम्यान, राज्य शासनाने अधिसूचना जारी करीत ६ जूनपासून चंद्रपूर जिल्ह्यातील दारू सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जिल्ह्यात अधिकृत दारू दुकाने सुरू झाली. या दिवसापासून मद्यपींनी अक्षरश: धुमाकूळ माजवला असून, अनेकांनी मनसोक्त दारू पित रस्त्यावर लोळणे सुरू केले आहे. मात्र यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.