मद्यधुंद चालकाने मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना चिरडले, दोन ठार
By Admin | Updated: January 22, 2017 11:47 IST2017-01-22T11:47:50+5:302017-01-22T11:47:50+5:30
सकाळी मॉर्निंग वॉक करीत असलेल्या पाच जणांना एका फोर्ड कंपनीच्या इको स्पोर्ट हे वाहन चालविणाऱ्या मद्यधुंद वाहन चालकाने

मद्यधुंद चालकाने मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना चिरडले, दोन ठार
>ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर, दि. 22 - येथील ऊर्जानगरात सकाळी मॉर्निंग वॉक करीत असलेल्या पाच जणांना एका फोर्ड कंपनीच्या इको स्पोर्ट हे वाहन चालविणाऱ्या मद्यधुंद वाहन चालकाने चिरडले. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यु झाला. तर 3 जन गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघात सकाळी 6 वाजता ऊर्जानगरातील पर्यावरण चौकात घडला. याप्रकरणी चालक व मालकाला अटक करण्यात आली आहे.
अपघात घडला तेव्हा वाहनात दोन व्यक्ती होत्या. मात्र वाहनचालक कोण हे अद्याप कळलेले नाही, कारण कारण दोघेही एकमेकावर आरोप करीत आहेत. विठ्ठल दडमल (40) आणि प्रदीप बागमवार (53) अशी अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत, तर सुनिल तुप्तेवार (52), भास्कर मुसळे, किशोर ठाकरे, साईनाथ शेंडे हे अपघातात जखमी झाले आहेत.