कोरपन्यातील शासकीय इमारतींची दुरवस्था

By Admin | Updated: October 28, 2015 01:14 IST2015-10-28T01:14:36+5:302015-10-28T01:14:36+5:30

कोरपना तालुकास्तरावरील अनेक शासकीय वास्तूंची देखभाल व देखरेखी अभावी दुरवस्था झाली आहे.

The drought of government buildings in the Koran | कोरपन्यातील शासकीय इमारतींची दुरवस्था

कोरपन्यातील शासकीय इमारतींची दुरवस्था

कान्हाळगाव : कोरपना तालुकास्तरावरील अनेक शासकीय वास्तूंची देखभाल व देखरेखी अभावी दुरवस्था झाली आहे. मात्र ज्या संबंधित विभागाच्या इमारती आहेत, त्यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याने इमारतींची दिवसेंदिवस दैनावस्था होत चालली आहे.
समाजमंदिर, जुने ग्राम विकास अधिकारी निवासस्थान, शासकीय गोदाम, तहसील सदनिका बेवारस पडल्या आहे. जुना पशुवैद्यकीय दवाखाना व सदनिका, जुनी जिनिंग, जुनी ग्राम पंचायत इमारत पूर्णत: मोडकळीस येऊन सुद्धा अद्यापही त्यांची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. एकीकडे शासन लाखो रुपये खूर्च करून इमारती बांधत आहे. मात्र केवळ अनास्थेमुळे या इमारती दुरवस्थेत आहेत.
कोरपना या तालुका मुख्यालयी अनेक विभागांना जागा व इमारती उपलब्ध नाही. असे असताना ज्या विभागांकडे या बाबी उपलब्ध आहे, त्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन इमारतींची दुरूस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)

Web Title: The drought of government buildings in the Koran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.