ट्रॅक्टर उलटला, चालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:22 IST2017-08-09T00:21:40+5:302017-08-09T00:22:06+5:30
शेतात चिखलनी करण्याकरिता एमएच ३४ एल ४१९६ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरने कोठारीकडून कवडजईकडे जात असताना हरणपायली जवळील नाल्यात ट्रॅक्टर पलटी झाले.

ट्रॅक्टर उलटला, चालकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठारी : शेतात चिखलनी करण्याकरिता एमएच ३४ एल ४१९६ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरने कोठारीकडून कवडजईकडे जात असताना हरणपायली जवळील नाल्यात ट्रॅक्टर पलटी झाले. यात चालक सुनील लटारू चौधरी (२८) यांचा ट्रॅक्टरखाली दबून जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
धान रोवणीसाठी शेतकरी प्रतीक्षेत होते. अशातच सोमवारपासून रिमझिम पाऊस सुरू असल्याने मंगळवारी सकाळी सुनील चौधरी हे चिखल करण्याकरिता सकाळी कोठारीवरून कवडजई येथे ट्रॅक्टरने जात होते. मात्र हरणपायली शिवारातील नाल्याजवळ ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर नाल्यात कोसळले. त्यात सुनीलचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मागे पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे.