फसलेला ट्रॅक्टर काढताना चालकाचा मृत्यू ...
By Admin | Updated: July 26, 2016 01:00 IST2016-07-26T01:00:44+5:302016-07-26T01:00:44+5:30
शेतात फसलेला ट्रॅक्टर काढण्याच्या प्रयत्न करीत असताना ट्रॅक्टरच पलटी झाला आणि यात चालकाचा जागीच मृत्यू झाला.

फसलेला ट्रॅक्टर काढताना चालकाचा मृत्यू ...
फसलेला ट्रॅक्टर काढताना चालकाचा मृत्यू ... शेतात फसलेला ट्रॅक्टर काढण्याच्या प्रयत्न करीत असताना ट्रॅक्टरच पलटी झाला आणि यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मोहाळी चक येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. रवी देशमुख (४०) असे मृताचे नाव आहे. रवी चालवित असलेला ट्रॅक्टर जमिनीत खोलवर रुतला. ट्रॅक्टरला काढण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात आले. पण अपयशच आले. शेवटी लाकडी बल्ल्या लावण्यात आल्या व पुन्हा प्रयत्न करण्यात आले. ट्रॅक्टर सुरू झाला, पण जोरदार बे्रक दबल्याने ट्रॅक्टर जागीच पलटी झाला. यात रवी चक्क ट्रॅक्टरखाली दबल्याने त्याचा मृत्यू झाला. रवीला दोन मुले आहेत.