वादग्रस्त १४ गावातील नागरिकांचे स्वप्न भंगले

By Admin | Updated: September 17, 2015 00:52 IST2015-09-17T00:52:58+5:302015-09-17T00:52:58+5:30

महाराष्ट्र-तेलंगणा या दोन्ही राज्याच्या दुहेरी कात्रीत सापडलेल्या ‘त्या’ वादग्रस्त १४ गावातील नागरिकांना पितृत्वासाठी झगडावे लागत आहे.

The dreams of controversial 14 villagers have been broken | वादग्रस्त १४ गावातील नागरिकांचे स्वप्न भंगले

वादग्रस्त १४ गावातील नागरिकांचे स्वप्न भंगले

मंत्र्यांना मायेचा पाझर फुटलाच नाही : महाराष्ट्र-तेलंगणा सीमावाद कायम
शंकर चव्हाण  जिवती
महाराष्ट्र-तेलंगणा या दोन्ही राज्याच्या दुहेरी कात्रीत सापडलेल्या ‘त्या’ वादग्रस्त १४ गावातील नागरिकांना पितृत्वासाठी झगडावे लागत आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे व तत्कालीन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी त्या गावांचा दौरा करून समस्या जाणून घेतल्या. यावेळी आपणाला विदारक परिस्थिती पाहायला मिळाल्याची कबुली त्यांनी दिली होती व काही महत्त्वाचे प्रश्न तत्काळ सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र अनेक दिवस लोटूनही त्या आश्वासनांची पुर्तता झाली नसल्याने मंत्र्याना आश्वासनाचा विसर पडला की काय, असा प्रश्न वादग्रस्त १४ गावातील नागरिकांनी ‘लोकमत’ने केलेल्या ‘आॅन द स्पॉट’ भेटीत केला.
दोन्ही राज्याचे स्वामित्व चालत असलेल्या या १४ गावातील नागरिकांची फरपट सुरू आहे. विकासाचे अनेक प्रश्न रेंगाळले आहेत. परमडोलीत आरोग्य उपकेंद्र आहे. पण कर्मचारी मुख्यालयी राहत नाही तर काही पदे रिक्त आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात मोबाईल सेवा पोहोचविण्यात शासनाला यश मिळाले असले तरी या वादग्रस्त १४ गावातील नागरिकांना दुरध्वनी सेवेचा लाभ मिळाला नाही. येथील काही गावे कोरपना ठाण्यात समाविष्ठ असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशा अनेक महत्त्वाच्या समस्या तत्काळ सोडविण्याचे आश्वासन गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी परमडोली गावात घेतलेल्या कार्यक्रमात दिले होते. मात्र समस्या सोडविण्याच्या हालचाली अजूच सुरू झाल्या नाहीत. परिसरातील काही गावात आजाराचे प्रमाण वाढले आहेत. दुरध्वनी सेवा गावात अजून पोहोचली नाही. दोन वेळेस महामंडळाची बस गावात येत असली तरी पक्या रस्त्यांची सोय झाली नाही.

Web Title: The dreams of controversial 14 villagers have been broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.