ब्रम्हपुरी जिल्हा करण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:28 IST2021-01-25T04:28:48+5:302021-01-25T04:28:48+5:30
यावेळी नगराध्यक्ष रिता उराडे, उपाध्यक्ष अशोक रामटेके, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, मुख्याधिकारी मंगेश वासेकर, जीवन प्राधिकरणचे उपकार्यकारी अभियंता घोडमारे, ...

ब्रम्हपुरी जिल्हा करण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार
यावेळी नगराध्यक्ष रिता उराडे, उपाध्यक्ष अशोक रामटेके, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, मुख्याधिकारी मंगेश वासेकर, जीवन प्राधिकरणचे उपकार्यकारी अभियंता घोडमारे, सभापती विलास विखार, प्रीतेश बुरले, बाला शुक्ला, नीलिमा सावरकर, आदी उपस्थित होते. पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, ब्रम्हपुरी विभागात ३५ वर्षांपसून विकासकामे रखडली होती. मात्र, आता विकासकामांना सुरुवात झाली. २५ कोटी प्रकल्प किमतीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसह अनेक कामे सुरू आहेत. तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, शल्यचिकित्सागृह, इ-ग्रंथालयालय रेल्वे उड्डाणपूल, अंडरग्राउंड गटार योजना, शासकीय कर्मचारी निवासस्थान, जलतरण तलाव, क्रीडा संकुल, गार्डन, पोटतलावाचे सौंदर्यीकरण, नगर परिषद इमारत, शहराचे सौंदर्यीकरण, न्यायालय नवीन इमारत यांसारख्या अनेक कामांना मंजुरी दिली. काही प्रस्तावित आहेत. गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण होऊन त्याचा फायदा येथील नागरिकांना मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली असता त्यांनी वार्षिक एक हजार कोटीच्या नियमित निधीव्यतिरिक्त ५०० कोटी वाढीव निधी मंजूर केला असल्याचेही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी प्रास्ताविक केले. आरोग्य निरीक्षक आर. एस. ठोंबरे यांनी आभार मानले.