डॉ. आंबेडकर शतकोत्तर जयंती समितीच्या अध्यक्षावर अविश्वासाचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:26 IST2021-03-25T04:26:58+5:302021-03-25T04:26:58+5:30
चंद्रपूर : येथील प्रतिष्ठित डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिती, चंद्रपूरच्या कार्यकारी मंडळाची बैठक त्रिशरण बुध्द विहार तुकूम ...

डॉ. आंबेडकर शतकोत्तर जयंती समितीच्या अध्यक्षावर अविश्वासाचा ठराव
चंद्रपूर : येथील प्रतिष्ठित डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिती, चंद्रपूरच्या कार्यकारी मंडळाची बैठक त्रिशरण बुध्द विहार तुकूम येथे अ. वि. टेभरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत समितीचे विद्यमान अध्यक्ष स्नेहल रामटेके यांच्यावर अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला. त्याला कार्यकारी समितीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी मान्यता दिली. यावेळी सभासदांनी अविश्वासाच्या ठरावाच्या बाजूने मतप्रदर्शन करून अविश्वास ठरवला मान्यता दिली. १२ विरुद्ध १ मताने अविश्वासाच्या ठरावाला मान्यता दिली. यावेळी विद्यमान उपाध्यक्ष असलेल्या निर्मला नगराळे यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून स्नेहल रामटेके कार्यरत होत्या. परंतु, समितीमध्ये निष्क्रिय व अकार्यक्षम असल्यामुळे त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव मांडण्यात आला. त्यांची बाजू मांडल्यानंतर त्यांच्या बाजूने कोणताही सदस्य नसल्याने १२ विरुद्ध १ मताने अविश्वास ठरावास मान्यता देण्यात आली. समितीच्या विद्यमान उपाध्यक्ष निर्मला नगराळे यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून निवड करुन आर्थिक व प्रशासकीय अधिकार त्यांच्याकडे देण्याचा ठराव केला. कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यावर सर्व समाज घटकांची आमसभा घेऊन वरील प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्याचे ठरविण्यात आले. सभेला कार्यकारी मंडळातील निर्मला नगराळे, स्नेहल रामटेके, शंकर वेल्हेकर, महादेव कांबळे, नागसेन वानखेडे, हरिदास देवगडे, रवी मून, प्रतिक डोरलीकर, प्रेमदास बोरकर, मृणाल कांबळे, गीता रामटेके, ज्योती शिवणकर, प्रेरणा करमरकर उपस्थित होते. संचालन समितीचे सचिव शेषराव सहारे यांनी केले.