डॉ. शीतल आमटे मृत्यू; अपघात की आत्महत्या; सायंकाळपर्यंत होणार उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 13:32 IST2020-12-02T13:31:31+5:302020-12-02T13:32:37+5:30
Shital Amte Chandrapur News डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्यूमागील कारणाचा उलगडा आज बुधवारी संध्याकाळपर्यंत होऊ शकेल असा अंदाज आहे. पोलिसांकडून विश्वसनीयरित्या मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या मृत्यूमागे अपघात की आत्महत्या याचे कारण स्पष्ट होणार आहे.

डॉ. शीतल आमटे मृत्यू; अपघात की आत्महत्या; सायंकाळपर्यंत होणार उलगडा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्यूमागील कारणाचा उलगडा आज बुधवारी संध्याकाळपर्यंत होऊ शकेल असा अंदाज आहे. पोलिसांकडून विश्वसनीयरित्या मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या मृत्यूमागे अपघात की आत्महत्या याचे कारण स्पष्ट होणार आहे. या संदर्भात सर्व पातळ््यांवर तपासकार्य वेगाने सुरू असून, लवकरच निष्कर्ष हाती येणार आहेत.
महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी, सोमवारी आनंदवनातील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. या घटनेने जनमानस हादरून गेले असून, लवकरात लवकर सत्य समोर यावे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.