डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण अंगीकारणे हीच खरी आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:27 IST2021-04-15T04:27:14+5:302021-04-15T04:27:14+5:30
चंद्रपूर : समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव ही मानवी मूल्ये स्वीकारलेला स्वाभिमानी आधुनिक समाज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निर्माण ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण अंगीकारणे हीच खरी आदरांजली
चंद्रपूर : समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव ही मानवी मूल्ये स्वीकारलेला स्वाभिमानी आधुनिक समाज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निर्माण करावयाचा होता. बाबासाहेबांच्या शैक्षणिक व सामाजिक चळवळीचा हाच खरा मूलाधार होता. ज्ञानाअभावी व्यक्ती आणि समाजाचे नुकसान जसे होते, तसेच एखादी व्यक्ती व समूहाला शिक्षण नाकारणे म्हणजे माणूस म्हणून त्याचे अस्तित्व नाकारून त्याची क्षमता मारून टाकणे होय, अशी बाबासाहेबांची शिक्षणविषयक धारणा होती. विषमतामुक्त शिक्षित समाज हे त्यांचे स्वप्न होते. त्यांची शिकवण अंगीकारणे हीच त्यांच्या जयंतीदिनी त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त भाजपा चंद्रपूर महानगर शाखेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त भाजपा चंद्रपूर महानगर शाखेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी महानगर भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर राखी कंचर्लावार, स्थायी समिती सभापती रवी आसवाणी, प्रकाश धारणे, ब्रिजभूषण पाझारे, विशाल निंबाळकर, रवींद्र गुरनुले, नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार, रामकुमार आकापेल्लीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.