पावसामुळे पोलिसांच्या तंबूची पडझड
By Admin | Updated: July 20, 2015 00:55 IST2015-07-20T00:55:55+5:302015-07-20T00:55:55+5:30
तेलंगाणा व महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेल्या वेडगाव येथे दारूबंदीसाठी उभारण्यात आलेल्या तंबूची पावसामुळे पडझड झाली.

पावसामुळे पोलिसांच्या तंबूची पडझड
पावसात काढावी लागली रात्र : लक्ष देण्याची मागणी
धाबा : तेलंगाणा व महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेल्या वेडगाव येथे दारूबंदीसाठी उभारण्यात आलेल्या तंबूची पावसामुळे पडझड झाली. त्यामुळे पोलिसांना पावसातच रात्र काढावी लागली.
जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी झाली व अवैध दारू विक्रीला रोखण्यासाठी तेलगंणा व महाराष्ट्र सीमेवर वेडगाव येथे चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षकातर्फे विशेष दारूबंदी पथक मोहीम अंतर्गत वेडगाव येथे पोलीस तंबू लावण्यात आले. तिथे चार पोलीस कर्मचारी दिवस-रात्र अवैध दारू विक्रीला रोखण्यासाठी कार्यरत असतात. परंतु, सध्या वादळी पावसाने तंबूची दैनाअवस्था झाली व तंबू पूर्णपणे पडले. त्यामुळे पोलिसांना रात्र पावसातच काढावी लागली. (वार्ताहर)