महिलांच्या प्रसाधन गृहाला लावला दरवाजा

By Admin | Updated: July 6, 2017 00:45 IST2017-07-06T00:45:19+5:302017-07-06T00:45:19+5:30

चंद्रपुरातील तुकूम मुख्य मार्गावरील महिलांचे प्रसाधन गृहाला दरवाजा नव्हता. यामुळे या शौचालयाचा वापर पुरुष वर्ग करीत होते.

Door to the women's toilet facility | महिलांच्या प्रसाधन गृहाला लावला दरवाजा

महिलांच्या प्रसाधन गृहाला लावला दरवाजा

मनसेचे अभिनव आंदोलन : मनपा प्रशासन लक्ष देईना
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपुरातील तुकूम मुख्य मार्गावरील महिलांचे प्रसाधन गृहाला दरवाजा नव्हता. यामुळे या शौचालयाचा वापर पुरुष वर्ग करीत होते. यात मात्र महिलांची गैरसोय होत होती. याकडे मनपा लक्ष वेधूनही दुर्लक्ष केल्याने महिलांच्या सन्मानासाठी मनसेने महिला प्रसाधन गृहाला स्वखर्चाने दरवाजा लावून दिला.
महापौर महिलाच असताना महिलांना योग्य सन्मान दिला जात नसल्याने संतप्त महिलांनी मनपा व महापौरांचा निषेध केला. या अभिनव आंदोलनाचे नेतृत्व मनसे शहरध्यक्ष मनदीप रोडे यांनी केले. त्यांच्या नेतृत्वात मनसे पदाधिकाऱ्यांनी जोरदार नारेबाजी केली. तुकूम येथील आझाद चौकात महिलांसाठी प्रसाधनगृह तयार करण्यात आले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून महिला प्रसाधनगृहाला दरवाजा नव्हता. यामुळे महिलांची गैरसोय होत होती. पुरुष महिलांच्या प्रसाधनगृहात जात होते. महापौर, उपमहापौर यांच्या क्षेत्रात महिलांची प्रसाधनगृहाअभावी कुचंबना होत असल्याने ेमहिलांच्या सन्मानासाठी मनसे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांनी हे अभिनव आंदोलन केले. प्रसाधनगृहाला स्वखर्चाने दरवाजा लावण्यात आला. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आंदोलनात मनसे शहर उपाध्यक्ष बाला चंदनवार, माया मेश्राम, मुकेश जक्कुलवार, अश्विन धनजिवय, आतिष वडते, नितीन बावणे, दिनेश इंगळे, मनविसे शहर उपाध्यक्ष नितेश जुमडे, रितेश मांडवकर, दिनेश महाकुलकर, प्रफुल मत्ते, प्रितम उमरे, सचिन लांडे, मनसे शहर उपाध्यक्ष अभिनव देशपांडे, सतिश खोडे, दिनेश इंगळे तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
तुकूम परिसरातील अनेक समस्यांकडे मनपाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत रोष आहे.

Web Title: Door to the women's toilet facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.